भरत जाधव यांची मुलगी दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेता भरत जाधव. भरतने आता पर्यंत अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. त्याच्या अभिनयाचे संपूर्ण महाराष्ट्र त्याला नवाजत आहे. भरतचा अभिनय हा नेहमीच कौतुकास्पद राहिला आहे.

त्याने सुरुवातील महाराष्ट्राची लोकधारा, आमच्‍या सरखे आम्‍हीच, ऑल द, बेस्ट, सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, अधांतर, सौजन्याची ऐशी तैशी अशा नाटकांत काम केले. मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती पुन्हा सही रे सही या नाटकातून.

महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव या चित्रपटात त्याला एक छोटा रोल मिळाला होता. भूमिका अगदी छोटी होती. मात्र त्यात देखील त्याने विजय मिळवला. बॉलीवूडमध्ये त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर खतरनाक, प्राण जये पर शान न जाये या चित्रपटात त्याने काम केले. अग बाई अरच्चा मधुन त्याची प्रसिध्दी आणखीन वाढली. तसेच जरा आणि खबरदार हे चित्रपट भन्नाट गाजले.

या दोन्ही चित्रपटांनी त्याला भरभरून यश दिले. खबरदार मध्ये तो एक पत्रकार होता. पत्र नव्हे शस्त्र हा त्याचा डायलॉग त्यावेळी खूप गाजला होता. त्यानंतर पछाडलेला, मुंबईचा डबे वाला, बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटात देखील त्याने उत्तम कामगिरी केली. अशात त्याची मुलगी ही आता खूप मोठी झाली आहे.

तसेच ती देखील तिच्या कार्यातून देश सेवा करत आहे. भरतच्या मुलीचे नाव सुरभी असे आहे. ती अभिनयापासून खूप दूर आहे. तिने वैद्यकीय शिक्षण घेतले असून ती आता एक डॉक्टर आहे. डॉ सुरभी जाधव ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या बाबां सारखी ती देखील आता मोठी प्रसिध्दी मिळवत आहे. भरतच्या पत्नीचे नाव सरिता आहे. मात्र ती देखील अभिनयात सक्रिय नाही.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *