‘भाभी जी घर पर है’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड

मुंबई | मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. “भाभिजी घर पर है” या प्रसिद्ध मालिकेतील कलाकार दिपेश भान यांचे निधन झाले आहे. दिपेश भान यांनी या मालिकेत मलखान सिंग ही भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांनी बरेच दिवस काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

साल 2019 मध्येच दीपेश यांचे लग्न झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार दीपेश शुक्रवारी क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळत असताना अचानक ते धाडकन खाली कोसळले. त्यांना काहीतरी होत आहे हे समजताच तेथील व्यक्तींनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

अभिनेता वैभव माथूर यांनी दीपेशच्या मृत्यू विषयी दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ” होय त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र मला याच्याबद्दल काहीच बोलायचे नाही. कारण काही बोलण्यासारखे उरलेले नाही.” दीपेश आणि वैभव हे दोघे खूप चांगले मित्र होते. या दोघांचीही मैत्री अर्धवट सोडून दीपेश पुढे निघून गेले आहेत.

दिपेशने आमिर खानसोबत काम केले आहे. आमिर खानसोबत T20 वर्ल्ड कपच्या जाहिरातीत ते दिसले होते. साल २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘फालतू उटपटांग चटपटी कहानी’ या चित्रपटात त्यांनी काम केले.’कॉमेडी का किंग कौन’, ‘कॉमेडी क्लब’, ‘भूतवाला’, ‘एफआयआर’ या कार्यक्रमांमध्ये देखील त्यांनी काम केले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *