बंगाली सिनेसृष्टी हादरली! प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन

मुंबई | संगीत सृष्टीतील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बंगाली आणि ओरिया गायिका निर्मला मिश्रा यांचे रविवारी निधन झाले. कोलकात्यातील चेतला भागातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. मिश्रा या काही काळापासून वयोमानानुसार आजाराने त्रस्त होत्या आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यात रविवारी त्यांचे निधन झाले.

काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी पीटीआयला सांगितले की त्यांना सकाळी 12.05 च्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे त्यांना जवळच्या नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. तिथे गायकाला मृत घोषित करण्यात आले. आज रात्री त्यांचा मृतदेह रुग्णालयातच ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

इमोन एकता झिनुक’, ‘बोलो तो अर्शी’, ‘कागोजेर फूल बोले’, ‘ई बांग्लार माती चाय’ आणि ‘आमी तोमर’ ही त्यांनी गायलेली काही प्रसिद्ध गाणी आहेत. निर्मला मिश्रा या संगीत सुधाकर बाळकृष्ण दास पुरस्काराने सन्मानित झालेल्या पहिल्या ओडिसा गायिका होत्या. ओडिसा संगीतातील त्यांच्या आजीवन योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी निर्मला मिश्रा यांनी अक्षय मोहंती, राखल मोहंती आणि शंतनू महापात्रा यांसारख्या अनेक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले होते.

त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वातील मंडळी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. तसेच त्यांचा चाहता वर्ग हा देखील खूप मोठा होता. त्यामुळे अनेक चाहते देखील सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *