प्रेमात धोका मिळाल्यामुळे प्रियसीने केली आत्महत्या; वाचून धक्काच बसेल

उत्तरप्रदेश | प्रेम हे मिळतच अस नाही आणि हे गमावतो अस देखील नाही. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला आजुबाजूच सार जग हे खुज वाटतं. ना त्याला स्वतःची जाणीव असते ना आपल्या कुटुंबाची जाणीव असते. मद्यपान, सिगारेट यांसारख्या नशेप्रमाण प्रेमात माणूस झिंगत असतो. आपल्यावर प्रेम करणारा व्यक्तीच त्याच्यासाठी सर्वकाही असतो. कदाचित तिच व्यक्ती जर दुर्लक्ष करत असेल तर त्याचा त्रासही होतो. कदाचित यातून आत्महत्या देखील घडतात. अशीच घटना उत्तरप्रदेश राज्यातील हरदोई या जिल्ह्यात घडली.

हरदोई जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. प्रेमात प्रियकरान प्रेयसीला धोका दिल्यान प्रेयसीनं गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना (26 सप्टेंबर 2022) रोजी घडली आहे. मुलीच नाव राणी असून तिच वय 18 वर्षे आहे. तिन सुसाईड नोट लिहली. प्रेयसीच्या कुटुंबीयांनी हरदोई जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीमुळे घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. त्यामध्ये संबंधित मृत मुलीन तिच्या प्रियकराचं नाव लिहलं असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलाय.

काय लिहल आहे सुसाईड नोटमध्ये:
घटनास्थळावर सापडलेली सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्यामध्ये लिहिलं आहे की, ‘माझ्या मृत्यूला प्रत्युष जबाबदार आहे. आधी त्यानं माझ्यावर प्रेम करण्याचं नाटक केलं. त्यानं माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले, आणि मन भरल्यावर निघून गेला. प्लीज, तुम्ही त्याला अजिबात सोडू नका. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, मरू तर शकते.’

पुढील तपास सुरू – अशा भयानक घटनेमुळ प्रेयसीच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी पोस्टमोर्टमसाठी आपल्या मुलीचं शव पाठवलं. जसजशी माहिती मिळेल तसतशी माहिती कळवू आणि कारवाई बाबत निर्णय घेऊ.या सर्व प्रकरणानंतर हरदोई पोलिस याचा पुढं शोध घेत आहे. दरम्यान, या प्रकाराने मात्र हरदोई जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीचा तपास वेगाने सुरू केला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *