अभिषेक बच्चनच्या आधी या अभिनेत्यावर जीवापाड प्रेम करत होती करिश्मा कपूर; पण…

दिल्ली | करिश्मा कपूर ही आता जरी बॉलीवूडमध्ये सक्रिय नसली तरी, तिने नव्वदच्या दशकात बॉलीवूड चांगलेच गाजवले आहे. तिच्या अभिनयाने ती खूप प्रसिद्ध झाली होती. कपूर घराण्यात मुलींना अभिनय करण्याची संधी नव्हती. मात्र हे पाश करिश्माने मोडून काढले आणि तिने बॉलीवूडवर राज्य देखील केले. अशात ती अभियन आणि नृत्यात देखील तरबेज होती. त्यामुळे तिच्या काळात तिने एका पेक्षा एक हिट चित्रपट केले.

करिअर घडत असतानाच या अभिनेत्रीने उद्योजक संजय कपूर बरोबर विवाह केला. तिचा हा विवाह चाहत्यांसाठी एक सुखद धक्का होता. यावेळी ती तिच्या कामापेक्षा लग्नामुळे खूप चर्चेत येऊ लागली होती. करिश्माने संजय बरोबर लग्न करण्याआधी दोन कलाकारांना डेट केलं होतं. मात्र या दोघांबरोबर तिने नंतर ब्रेकअप केले.

करिश्मा कपूरचे नाव बऱ्याच अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. मात्र यातील एक नाव कदाचित तुम्हाला अजून माहीत असेल. अजय देवगण देखील त्या काळी बॉलीवूड कमालीचं गाजवत होता. अशात या दोघांच्या चर्चा माध्यमांवर फार आल्या नाही. मात्र हे दिघे देखील एकमेकांच्या प्रेमात होते.

सुहाग आणि जिगर अशा काही चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. यावेळी या दोघांमध्ये मैत्री झाली. पुढे मैत्री प्रेमात बदलली. मात्र काही दिवसांनी अजयचे नाव रविना टंडन बरोबर जोडले जाऊ लागले. त्यामुळे करिश्मा आणि अजय या दोघांच्या प्रेमाला पूर्णविराम लागला.

त्या नंतर करिश्माचे नाव अभिषेक बरोबर जोडले जाऊ लागले. दोघांच्या प्रेमाची खूप चर्चा रंगली होती. दिघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. या दोघांच्या प्रेमाची सुरुवात अभिषेकच्या बहिणीच्या लगणापासून झाली होती. साल 1997 मध्ये अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि राज कपूर यांचा नातू निखिल नंदा याचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला.

यावेळी अभिषेक आणि करिश्मा पहिल्यांदा एकमेकांना भेटले. त्यानंतर या दोघांची मैत्री वाढली. दिघे एकमेकांवर प्रेम करू लागले. त्या काळी करिश्मा बॉलीवुडवर राज्य करत होती. मात्र अभिषेक बॉलीवूडमध्ये नवखा होता. त्यांना त्याची कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती. अशात साल २००२ साली या दोघांच्या लग्नाची धामधूम सुरू असल्याचं समजल. मात्र अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवसानिमत्त या दोघांचा साखरपुडा पार पडला. मात्र त्यानंतर अवघ्या पाच महिन्यात या दोघांचे प्रेम संपले. त्यांचा साखरपुडा मोडला.

यावेळी माध्यमांवर करिश्माची आई बबितामुळे या दोघांचा साखरपुडा मोडला असे म्हटले जात होते. त्यावेळी अभिषेक तितकासा मोठा हीरो नव्हता. तसेच बच्चन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. अशा परिसथितीमध्ये आपल्या मुलीचे लग्न त्या घरात व्हावे असे बबिता यांना वाटत नव्हते. तसेच लग्ना नंतर जया बच्चन यांची अशी इच्छा होती की करिश्माने लग्न नंतर अभिनय करू नये. अशी अनेक कारणे नंतर समोर येऊ लागली.

नंतर २९ सप्टेंबर २००३ साली तिने संजय कपूर बरोबर लग्न केले. तो शीख धर्मीय असल्याने त्याच्या रीतीरिवाजात हे लग्न झाले. नंतर या दोघांना अदारा आणि कियान ही दोन मुलं देखील झाली. मात्र याचा संसार देखील नंतर मोडून पडला. लग्नाच्या १३ वर्षांनी यांचा घटस्फोट झाला. यावेळी अभिनेत्रीने संजयवर अनेक गंभीर आरोप केले होते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *