टॅटू काढत असाल तर सावधान! 14 मुलांना टॅटूमुळे एकच वेळी झाली एचआयव्हीची लागण

उत्तर प्रदेश | आपलं नाव किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव आपल्या हातावर किंवा हृदयावर कायमचं कोरलं जावं यासाठी अनेक व्यक्ती टॅटू काढतात. अनेकांना या टॅटूची इतकी आवड असते की, त्यांच्या शरीरावर बऱ्याच ठिकाणी टॅटू काढलेले असतात. सध्याच्या घडीला शरीरावर टॅटू काढणे हे एक क्रेझ झाले आहे. तरुण वयातील बरेच मुलं मुली याकडे अधिक आकर्षित आहेत.

अशात टॅटू काढत असताना आपण नेहमी टॅटू काढत असलेल्या व्यक्तीला विचारतो की, जास्त दुखणार तर नाही ना? हा टॅटू किती दिवस टिकेल? जर कुणाचे नाव लिहायचे असेल तर ते कसे लिहायला हवे? कोणत्या ठिकाणी टॅटू काढल्यावर तो अधिक आकर्षक दिसेल? असे अनेक प्रश्न टॅटू काढताना विचारले जातात. मात्र याचबरोबर टॅटू काढत असताना टॅटू काढणाऱ्या व्यक्तीने त्याची सुई बदलली आहे की नाही हे तपासणी देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

उत्तर प्रदेशातील 14 जणांना हे टॅटू काढणं चांगलंच महागात पडलं आहे. टॅटू काढून घरी आल्यावर या चौदा मुलांना अचानक ताप भरला. त्यानंतर त्यांना उलट्या देखील होऊ लागल्या. त्यांचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांनी मलेरिया आणि टायफाईड या दोन रोगांची तपासणी केली. मात्र यातील त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आजाराचे निदान होत नसल्याने पुढे त्यांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. यावेळी ते एचआयव्ही पॉझिटिव्ह निघाले.

त्यानंतर त्यांनी असुरक्षितरित्या लैंगिक संबंध ठेवले होते का असे त्यांना विचारले गेले. त्यावेळी त्या सर्व मुलांनी नाही असे उत्तर दिले. मग तरी देखील एकत्र या 14 जणांना एचआयव्हीची लागण कशी काय झाली? हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी ज्या ठिकाणी टॅटू काढला त्या व्यक्तीने सगळ्यांना एकच सुई वापरली. ही सुई देखील आधी त्याने कुणावर तरी वापरली होती. पैसे वाचवण्याच्या हेतूने त्या व्यक्तीने असे केले. त्यातही गोष्ट या 14 मुलांना चांगलीच महागात पडली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *