बापरे! बसमध्ये बायको बरोबर हे काय करून बसला सिद्धार्थ, चाहते म्हणतायत, संपलास तू….

मुंबई | सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेट बॉय. सिद्धार्थ जितका क्यूट आहे त्यापेक्षा दुप्पट तो खट्याळ आणि अतरंगी आहे. सोशल मीडियावर त्याच्या या अरांगीपणाचे अनेकदा दर्शन होत असते. सतत काही ना काही करामती तो करत असतो. अशात आता नुकताच त्याने असाच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र अनेकजण त्याला “आता तुझं काही खरं नाही” अशा कमेंट करत आहेत. तर आता या वेळी या पठ्ठ्यानं कोणती करामत केली आहे हे पाहू.

सिद्धार्थ आणि त्याची बायको हे दिघेई एका बस मधून बाहेर कुठे तरी चालले आहेत. यावेळी त्याची बायको मिताली झोपलेली दिसते. मात्र झोपेत तिचं तोंड उघडं राहील आहे. बस एवढंच निम्मित झालं आणि सिद्धार्थने लगेचच यावर रिल व्हिडिओ बनवली. यात तो शिट्टी वाजवत आहे आणि आआआआ…. असा सूर लागल्यावर तो कॅमेरा मिताली कडे फिरवतो आहे.

हा व्हिडिओ पाहून आता सोशल मीडियावर एकच हशा पिकला आहे. माणूस झोपलेलं असताना देखील सिद्धार्थला मस्ती पासून काही दूर जाता आलेलं नाही. आता या व्हिडिओवर चाहत्यांसह अनेक कलाकार देखील कमेंट करत आहेत. अमृताने यावर कमेंट करत लिहिलं आहे की, “हा हा सो क्यूट….”, तर “संपलास तू… ” असं गायिका जुईली जोगळेकर म्हणत आहे. हा हा बिचारी…., डिनर नाही मिळणार आता तुला…. अशा अनेक मजेशीर कमेंट येत आहेत.

सिद्धार्थ एक भारतीय मराठी चित्रपट अभिनेता आहे. त्याने स्वतःला मराठी चित्रपट सृष्टीत सर्वात लोकप्रिय आणि अग्रणी अभिनेता म्हणून स्थापित केले आहे. वयाच्या १९ व्या वर्षी त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सिद्धार्थ चांदेकरने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बॉलिवूड फिल्म हमने जीना सिख लिया (२००७) आणि त्याचा मराठी चित्रपट डेब्यू पॉलिटिकल फी ड्रामा फिल्म झेंडा (२०१०) पासून केली होती. सिद्धार्थ हा मराठी टेलिव्हिजनमध्ये अग्निहोत्र, कशाला उद्याची बात, मधु इथे न् चंद्र तिथे, प्रेम हे…, जिवलगा, सांग तू आहेस का? यात दिसला होता.

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित २०१५ साली आलेला ब्लॉकबस्टर क्लासमेटमध्ये तो दिसला. ऑनलाईन बिनलाईन या रोमँटिक विनोदी चित्रपटात तो मुख्य भूमिकेत होता. २०१६ मध्ये तो ‘वझदार’ या चित्रपटात मराठी सुपरस्टार सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांच्यासह मुख्य भूमिकेत होता. तो स्पृहा जोशी आणि पिंडदान सोबत ‘लॉस्ट अँड फाउंड’ या मराठी चित्रपटातही दिसला. २०१८ मध्ये सिद्धार्थने गुलाबजाम या मराठी ब्लॉकबस्टर फिल्ममध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *