बापरे! हेअर ट्रान्सप्लांट करून आपला खरा चेहरा लपवतात हे दिग्गज कलाकार; लिस्ट पाहून म्हणाल…

मुंबई | प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्याची परिभाषा ही वेगवेगळ्या पद्धतीने केली गेली आहे. यामध्ये बऱ्याचदा स्त्रीचे केस हे लांब सडक असणे गरजेचे आहे तरच ती सुंदर असं म्हटलं जातं. असाच सध्याच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात अनेक स्त्रियाच नाही तर पुरुषांचे देखील केस गळतात. वयानुसार अनेक पुरुषांना टक्कल देखील पडते.

मात्र आता हे जर असं बॉलीवूडमधील कलाकारांबरोबर होत असेल तर काय? या कलाकारांना काम करण्यासाठी सुंदर आणि व्यवस्थित दिसणे खूप गरजेचं असतं. त्यामुळे अनेक जण आपल्या डोक्यावर हेअर ट्रान्सप्लांटेशन करतात. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी असं केलेलं आहे. या बातमीमधून त्याचं कलाकारांविषयी जाणून घेऊ.

अमिताभ बच्चन
बॉलीवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचे नाव या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर घ्यावे लागेल. कारण अजूनही आपल्या अभिनयाने आणि आधी सारख्याच जोमाने ते अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. अशात या अवलियासाठी 1990 चा काळात थोडा कठीणाईचा ठरला. या काळात त्यांच्या हातात फारसे चित्रपट नव्हते. त्याचं कारण होतं त्यांचं डोकं. डोकं म्हणजे त्यांची बुद्धी नाही तर त्यांच्या डोक्यावरचे केस. त्यामुळे त्यांच्या अभिनयाला देखील उतरती कळा लागली होती. मात्र कौन बनेगा करोडपती या शोने त्यांना कलाक्षेत्रात कलाटणी दिली.

अक्षय कुमार
बॉलीवूडच्या खिलाडीला देखील हँडसम दिसण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांटची गरज पडली आहे. वयाच्या चाळीशीमध्ये त्याला केस गळण्याच्या भरपूर समस्या होत्या. त्यामुळे त्याने हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट केली. अक्षय पुन्हा एकदा भूमी पेडणेकर बरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रक्षाबंधनाच्या आगामी चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.

सलमान खान
सलमान खान देखील या यादीमध्ये शामिल आहे. त्याने देखील हेअर ट्रान्सप्लांट केल आहे. सलमान अजूनही अविवाहित आहे. तसेच त्याची अभिनयाची कारकीर्द त्याला लवकर संपवायची नाही. त्यामुळे दुबई येथून त्याने हेअर ट्रान्सप्लांट केले. ज्यावेळी त्याने ही शस्त्रक्रिया केली होती त्यावेळी माध्यमांवर त्याची मोठी चर्चा रंगली होती. सलमान खान लवकरच टायगर ३ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कपिल शर्मा
कपिल शर्माने अभिनय क्षेत्रात आजवर मोठी कामगिरी केली आहे. मात्र त्याचा प्रवास हा फारच कठीण होता. अनेक कलाकारांनी अभिनयात पदार्पण केल्यानंतर बऱ्याच वर्षांनी हेअर ट्रान्सप्लांटची ट्रीटमेंट केली. मात्र कपिलला हा त्रास खूप लवकर जाणवू लागला. अगदी त्याच्या करिअरच्या सुरुवातीलाच त्याला या समस्येने ग्रासले होते. त्यावेळेस त्याने हेअर ट्रान्सप्लांट करून घेतले.

हिमेश रेशमिया
यादी गायक हिमेश रेशमिया याचे देखील नाव आहे. अगदी सुरुवातीच्या काळात जर तुम्ही पाहिलं तर हिमेशच्या डोक्यावर नेहमीच टोपी असायची. यावरून त्याला बऱ्याच जणांनी चिडवलं देखील होतं. या सर्व परिस्थितीत खचून न जाता त्याने देखील हेअर ट्रान्सप्लांट करून घेतल आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *