बापरे! संतोष जुवेकर आणि मनोज वाजपेयी या दोन्ही कलाकारांमध्ये झाली मोठी मारामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता संतोष जुवेकर आणि हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे अभिनेता मनोज वाजपेयी हे दोन्हीही कलाकार आज सिने जगतात मोठे नाव कमवत आहेत. दोघांचा अभिनय इतका दमदार आहे की त्यांचा चाहता वर्ग अफाट मोठा आहे. दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात आणि घडणाऱ्या घडामोडींवर स्वतःच निर्भीडपणे मत व्यक्त करत असतात. अशाच सोशल मीडियावर सध्या या दोन्ही कलाकारांची चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा काही चांगली नसून थोडी चिंता वाढवणारीच आहे.

वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधील हे दोन्ही कलाकार बेदम हाणामारी करताना दिसत आहेत. या दोघांचा मारामारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांवर तुटून पडलेले दिसत आहेत. दोघेही समान जोषात एकमेकांना खूप मारहाण करत आहे. या दोघांचीही मारहाण पाहून काळजात धडकीच भरते आहे. चाहते तसेच नेटकरी हा व्हिडिओ पाहून मोठ्या चिंतेत पडले आहेत. हे दोन्ही एवढे चांगले कलाकार असून अशा पद्धतीने मारामारी का करत आहेत? या दोघांमध्ये असं नेमकं कोणत्या कारणावरून बिनसल आहे? असे अनेक प्रश्नच चाहत्यांना पडले आहेत.

अशात या व्हिडिओचा आम्ही शोध घेतला आणि या व्हिडिओ संदर्भातलं एक सत्य आमच्या समोर उघड झालं. मंडळी हा व्हिडिओ अभिनेता संतोष जुवेकरने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरा नसून तो एका चित्रपटांमधील शूटिंग सिनचा आहे. संतोषने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केल्याने ही माहिती मिळाली.

संतोष नेहा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की, ” माझा आणि मनोज वाजपेयीचं भांडण अक्षरशः हाणामारी पर्यंत पोहोचलं. आणि पुढे जे घडलं ते सांगतो तुम्हाला पुराव्यासाठी व्हिडिओ पोस्ट करतोय.” असं त्याने लिहिलं आहे. संतोष दिवेकर आणि मनोज वाजपेयी या दोघांच्या मारामारीचा हा व्हिडिओ भोसले हिंदी चित्रपटातील आहे. या चित्रपटामध्ये हिंदी भाषिक आणि मराठी माणूस यांच्यातला संघर्ष दाखवण्यात आला आहे. दोघेही आपल्या जागी बरोबर असून देखील त्यांच्यात होत असलेले वाद समोर आणण्याचा हा एक प्रयत्न आहे.

मात्र हा व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे तसेच नेटकरी यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. संतोष जुवेकरच्या अभिनयातील कारकिर्दी विषयी बोलायचे झाल्यास त्याने आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिका आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. झेंडा, मोरया, एक तारा, रेगे हे त्याचे काही प्रसिद्ध आणि गाजलेले चित्रपट आहेत. मनोज वाजपेयी यांच्या विषयी सांगायचं झाल्यास त्यांनी हिंदी सिनेसृष्टी चांगलीच दणाणून सोडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *