बापरे! रणवीर सिंग झाला निवस्त्र, या कारणासाठी काढावे लागले कपडे

मुंबई | बाजीराव मस्तानी, पद्मावत, राम लीला अशा अनेक चित्रपटांमध्ये रणवीर सिंगने त्याच्या अभिनयाने संपूर्ण बॉलीवूड दणाणून टाकला आहे. अशात आता त्याच्या संबंधित एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये रणवीरचा अवतार पाहून सगळे जण थक्क झाले आहेत.

एखादा ब्रँड, मॅकझीन, चित्रपट अथवा जाहिरात यामध्ये आपण आता पर्यंत अनेक अभिनेत्रींचे अथवा मॉडेलचे न्यूड फोटो पाहिले असतील. मात्र तुम्ही कधी कोणत्या अभिनेत्याला न्यूड फोटो शूट केलेलं पाहिलं आहे का? कदाचित सगळ्यांचं यासाठी नाही असच उत्तर येईल. मात्र फक्त अभिनेत्रींनी न्यूड शूट करावं ही परिभाषाच रणवीरने बदलली आहे.

त्याने स्वतःच न्यूड फोटो शूट केलं आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत. त्याच्या या कामगिरीसाठी आता अनेक जण त्याच कौतुक करत आहेत तर काही जण त्याला खूप ट्रोल करत आहेत. काही युजर म्हणत आहेत की, ” पैसा माणसाचे कपडे देखील सोडत नाही.” अशा अनेक विचित्र कमेंट त्याच्या फोटोंवर येत आहेत.

रणवीरने हे फोटो शूट एका मॅकझीनच्या कवर पेज साठी केलं आहे. “ब्रावो” या मासिकाच्या कवर पेजसाठी त्याने हे शूट केलं आहे. रणवीर सिंगने काही साल २०१८ मध्ये दीपिका बरोबर लग्न केले. या दोघांनी या आधी अनेक चित्रपटात एकमेकांबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.

अशात आता रणवीरने असे फोटो शूट केल्याने याचा परिणाम दीपिकावर देखील होत आहे. अनेक जण दीपिकाला देखील बरेच प्रश्न विचारत आहेत. प्रसिध्दी आणि पैसा मिळवण्यासाठी एक कलाकार कोणतीही सीमा पार करू शकतो हेच यातून समजत आहे.

त्याचे असे फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काहींनी तर यावर रडायचे ईमोजी देखील पाठवले आहेत. रणवीरच्या हाती सध्या सर्कस आणि रॉकी ओर राणी की प्रेम कहाणी असे दोन मोठे चित्रपट आहेत. सध्या तो या चित्रपटांच्या शुटींगमध्ये देखील व्यस्त आहे.

रणवीरने आजवर अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्याचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची जादू करतात. अशात आता त्याच्या रॉकी ओर राणी की प्रेम कहाणी या चित्रपटात त्याच्यबरोबर अभिनेत्री आलिया भट्ट आपल्याला स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *