बापरे! लग्नाच्या अगोदर अनेक अभिनेत्रींच्या प्रेमात पडला होता माही; लिस्ट पाहून तोंडात बोटे घालाल

दिल्ली | क्रिकेट आणि बॉलिवूड यांमध्ये एक वेगळे नाते आहे. अनेक क्रिकेटर्सचे नाव बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे. यातीलच एक भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी. धोनीच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट देखील बॉलीवूडमध्ये काढण्यात आला होता.

यामध्ये आपण पाहिलं की धोनीची एक गर्लफ्रेंड असते तिचा मृत्यू होतो. त्यानंतर धोनी साक्षी बरोबर विवाह करतो. मात्र या सर्वांमध्ये त्याच्या आयुष्यात लग्नाआधी अनेक अभिनेत्री येऊन गेल्या आहेत. त्या बातमीतून त्याच अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत.

दीपिका पदुकोण
महेंद्रसिंग धोनी दीपिकाच्या प्रेमात पडला होता. त्यावेळी दीपिका आणि धोनी या दोघांच्या नावाची तुफान चर्चा रंगली होती. मात्र नंतर दीपिकाचे नाव युवराज सिंग बरोबर जोडले जाऊ लागले. त्यामुळे नंतर धोनीने दीपिका कडे दुर्लक्ष केले.

दीपिकाचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा धोनीने एका मुलाखतीत ती त्याची क्रश असल्याचे सांगितले होते. तसेच नंतर भारत आणि ऑ्ट्रेलियाच्या टी २० सामन्यात एकदा दीपिका धोनीला चेअर करताना दिसली होती. मात्र या दोघांची प्रेम कहाणी हवी तशी रंगली नाही.

प्रीती सिमोन
धोनीचे नाव प्रीती सिमोन बरोबर देखील जोडले गेले आहे. तिने आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशात धोनी आणि प्रीती या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले होते.

राय लक्ष्मी
साल 2008 मध्ये धोनीचे नाव राय लक्ष्मी अभिनेत्री बरोबर देखील जोडले जात होते. राय लक्ष्मी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. राय लक्ष्मी बरोबर धोनी अनेकदा वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये दिसला होता. त्यामुळे या दोघांच्या अफेअरची चर्चा तुफान रंगली होती. मात्र नंतर सात 2009 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला.

असिन
असीन या अभिनेत्रीला गजनी या चित्रपटातून विशेष प्रसिध्दी मिळाली होती. अजय देवगण बरोबर देखील ही अभिनेत्री स्क्रीन शेअर करताना दिसली. तिच्या अभिनयाची चर्चा जेव्हा सुरू होती. त्याच वेळी तिचे नाव धोनी बरोबर देखील जोडले जात होते.

धोनी आणि ती एका क्लोथिंग ब्रँडचे ब्रँड अँबेसिडर देखील राहिले आहेत. साल 2010 मध्ये धोनी या अभिनेत्रीच्या घरी जाताना दिसला होता. मात्र त्यानंतर या दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. तसेच पुढे धोनीने साक्षी बरोबर विवाह केला. तरी या होत्या महेंद्रसिंग धोनीच्या काही बॉलिवूड मधील गर्लफ्रेंड.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *