बापरे! घरात तीन दिवस मृतदेह सडले, वास सुटल्यावर नागरिक जागे झाले; ३ महिलांची निर्घृण हत्त्या

नवी दिल्ली | पोलिस नेहमीच आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांचे रक्षण करतात. राज्यात सुरू असलेल्या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवतात. यात कुणाचा खून झाला असेल तर मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळतात. अशात आता एक खूप मोठा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये चक्का एका पोलिस लाईनमध्ये हत्या झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकूण तीन व्यक्तींची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी यावेळी हतबल न होता सापळा रचून गुन्हेगाराला जेल बंद केले आहे.

ही घटना जमशेदपूर येथील पोलिस लाईनमध्ये घडली आहे. यामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबल महिलेसह तिची आई आणि मुलगी अशा तिघींना खून केला आहे. या कॉन्स्टेबल महिलेचे पती काही दिवसांपूर्वीच नक्षलवादी चकमकीत मारले गेले. त्यानंतर महिला आपल्या आई आणि मुली बरोबर राहत होत्या. घटना घडल्यावर ३ दिवस मृतदेह घरातच पडून राहिला त्यामुळे खूप दुर्गंधी सुटली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना तची खबर दिली.

२१ जुलै रोजी जवळपास आठच्या सुमारास जोधपूर पोलीस लाईनमधील व्यक्तींनी कंट्रोल रूमवर फोन फिरवला. एका खोलीतून खूप वास येत आणि काही तरी गडबड आहे असे सांगत त्यांनी हा फोन केला. पोलिस घटनास्थळी पोहचले त्यावेळी त्यांनी पाहिले की, तीन महिलांचा मृतदेह तिथे पडला होता.

मृत महिला पोलिस कॉन्स्टेबल महिला सविता हेम्‍ब्रम त्यांच्या आई लकीया आणि त्यांची मुलगी गीता यांचा होता. पोलिसांनी शव ताब्यात घेऊन शोध कार्य सुरू केले. तपासात लक्षात आले की, जमशेदपूर येथील एका पोलिस अधिकाऱ्याच्या वाहन चालकाने (रामचंद्र सिंह) हा खून केला आहे. सुरुवातीला रामचंद्रने पोलिसांची दिशा भुल केली. मात्र नंतर त्यांच्या हाती योग्य पुरावे लागले. यामुळे आता सदर गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आहे.

• का केली हत्या
चौकशी दरम्यान समजले होते की, रामचंद्र हा कॉन्स्टेबल महिला सविता यांचा मित्र होता. तो नेहमी त्यांच्या घरी जायचा. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी देखील तो तिथेच झोपायचा. त्यानंतर त्याचा फोन तपासला तेव्हा १९ जुलै पर्यंत त्याने सविता यांना खूप फोन केले होते. हे फोन १९ जुलै पासून बंद झाले. याच वेळी पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी तपास अधिक वेगाने सुरू केला.

• हत्येची दिली कबुली
यावेळी रामचंद्रने सांगितले की, “मी आणि सविता आम्ही खूप चांगले मित्र होतो. मात्र काही दिवसांपूर्वी तिने तेथील परिसरात राहणारा तरुण सुंदर तुडू यांच्या बरोबर मैत्री केली. त्यानंतर तिने मला टाळायला सुरुवात केली. याचा मला राग आला. त्यामुळे मी सुंदर आणि सविता या दोघांना मारण्याचा प्लॅन केला. मला समजले की, सुंदर १९ तारखेला सविताच्या घरी येणार आहे. त्यामुळे मी देखील तिथे गेलो मात्र तो काही आलाच नाही. मग सविता बरोबर माझी बाचाबाची झाली. यामुळे रागाच्या भारत मी तिचा खून केला.”

सविता यांच्या आई आणि मुलीला का मारले असे विचारल्यावर त्याने सांगितले की, ” मला त्यांना मारायचे नव्हते. मात्र त्यांनी मला सविताला मारताना पाहिले होते. कोणताही पुरावा शिल्लक राहू नये म्हणून मला त्यांना देखील संपवावे लागेल. ” असे त्याने सांगितले. या घटनेने पोलीस लाईनमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांनी आता आरोपीला जेल बंद केले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *