बापरे! २ वर्षीय चिमुकल्याचा पराक्रम; दाताने केले सापाचे दोन तुकडे, पुढे जे घडलं…

दिल्ली | सर्प दंश झाल्यानंतर भल्या भल्या धीट लोकांचा आर्धा जीव साप चावला या भीतीने जातो. मात्र तुर्कीमध्ये दोन वर्षांच्या मुलीबरोबर एक धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीने चक्क सापाचा फडशा पाडला आहे आणि तो ही स्वतःच्याच दातांनी.

दोन वर्षीय लहान मुलगी खेळत असताना तिच्या जवळ जवळपास एक आर्धा मीटर लांबीचा साप आला. यावेळी तिला वाटले की हे माझे खेळणे आहे. तिने त्याला हातात घेतलं आणि खेळू लागली. त्यावेळी सापाने तिच्या ओठांचा आणि गालाचा चावा घेतला. यावेळी ती जाम भडकली.

तिला वेदना झाल्याने तिचा राग अनावर झाला. त्यानंतर तिने देखील सापाचा कचा कचा दातांनी चावा घेतला. साप चावला तेव्हा ही चिमुकली जोरात ओरडली होती. त्यावेळी शेजारी धावत तिच्याजवळ पोहचले. यावेळी मुलीला पाहून ते खूप भयभीत झाले.

कारण तिला सापाने घेरलं होतं, आणि तिने सापाला. मुलीच्या घरी तिचे बाबा नसल्याने शेजारच्या व्यक्तींनी तिला त्या सपापासून वेगळं केलं. यावेळी त्या मुलीला सापाला अजून चावयंच होतं. कारण तिला खूपच राग आला होता.

शेजारील व्यक्तींनी तिची त्या सापापासून सुटका करून तिला रुग्णालयात दाखल केले. यावेळी २४ तास या मुलीला दवाखान्यात निरीक्षणात ठेवले गेले. तिच्यावर उपचार केले गेले. आता ही चिमुकली धोक्यातून बाहेर आहे.

सापाला पकडले असताना सापाने तिच्या ओठावर आणि गालावर खूप चावा घेतला होता. तर या मुलीने सापाच्या पुढे एक पाऊल टाकत मला चावतो काय थांब आता तुला मी चवणार…. असं म्हणत त्या सापाचा एवढा चावा घेतला की त्याचे चक्क दोन तुकडे पडले.

या संपूर्ण घटनेत सापाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचे चिमुकलीने जागीच दोन तुकडे केले होते. तर मुलगी आता ठीक असून लवकरच तिच्यावर संपूर्ण उपचार करून तिला घरी पाठवले जाणार आहे.

नियती कधी कसा खेळ खेळेल याचा काही नेम नाही याची प्रचिती या दोन वर्षांच्या मुलीने घडवून दिली. तिचा राग या सापाला संपविण्यात पुरेसा राहिला. जेव्हा तिचे बाबा घरी आले तेव्हा हा सर्व प्रकार ऐकून त्यांचे काळीज हादरले. मात्र त्यांच्या काळजाचा तुकडा म्हणजे त्यांची चिमुकली जिवंत आहे आणि धोक्यापासून बाहेर आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *