करण जोहरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; ‘त्याने कायमचा…’

मुंबई | बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. एखाद्या मुद्यावरून नेटकरे त्याला ट्रोल करत असतात. त्यानं आपलं ट्विट अकाऊंट डिलीट केलंय. हे अकाऊंट डिलीट करण्याचं कारण म्हणजे सकारात्मकतेकड पुढचं पाऊल अस त्याच म्हणणं आहे.

करणनं काय केलं ट्वीट – ‘पॉझिटिव्ह एनर्जी मिळवण्यासाठी आयुष्यात स्पेस निर्माण करत आहे. त्यासाठी हे पहिलं पाऊल उचललं आहे. गुडबाय ट्विटर’, असं ट्वीट शेअर करुन करणनं ट्विटर अकऊंट बंद केलं. त्याचं हे ट्वीट पाहून अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली – नेक वर्षांपासून कारणच कॉफी विथ करण हा शो सुरू आहे. या शोमध्ये प्रत्येक कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल करण जाणून घेतो. काही जणांनी या शोला मुर्खात काढलंय.

नेटकऱ्यांनी सोशल मीडियातून करणला डिवचल आहे. काही युजर्स म्हणतायत की तुझी आठवण येणार नाही. तर काही जण म्हणतायत की तुमचा कॉफी विथ करण हा कचरा असणारा शो इंटरनेटवरून हटवा.

करणच्या कॉफी विथ करणचा सातवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सीझनमध्ये अनेक सेलिब्रीटींनी हजेरी लावली. ओटीटीवर रिलीज झालेल्या या कार्यक्रमाला अनेकांची पसंती मिळाली. पण काहींनी मात्र या कार्यक्रमाला ट्रोल केलं. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सीझन रिलीज झाला होता.

करणचे आगामी सिनेमे – रॉकी औरक रानी की प्रेम कहानी आणि योध्दा हे करणचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *