दिग्गज अभिनेत्याच्या निधनानंतर कुटुंबावर आले वाईट दिवस; एवढे आहे कर्ज

मुंबई | छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने सर्वांना हसवणारा आणि निखळ मनोरंजन करणारा अभिनेता दीपेश भान याचे गेल्या महिन्यात निधन झाले. त्याच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला. आता त्याच्या कुटुंबीयांविषयी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

दीपेश भान याची पत्नी आणि त्याचा मुलगा बेघर होऊ शकतात असे म्हटले जातं आहे. त्यामुळे एका अभिनेत्रीने त्याच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन केले आहे. दीपेश भान आपल्या सर्वांना सोडून दूर निघून गेला आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्यानंतर त्याला एक मुलगा देखील झाला.

यावेळी हक्काचं घर असावं म्हणून दीपेशने बँकेतून कर्ज घेतले. त्यानंतर त्याने एक घर खरेदी केले. आता या घराचे उर्वरित पैसे भरण्यासाठी दीपेश हयात नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीवर आणि मुलावर मोठे आर्थिक संकट आले आहे. घराचे उर्वरित पैसे न भरल्यास त्यांना घर खाली करावे लागणार आहे.

यामुळे सौम्या टंडन या अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती म्हटली आहे की, ” दीपेश हा एक उत्तम अभिनेता होता. त्याच्यावर आणि त्याच्या अभिनयावर तुम्ही सगळ्यांनी प्रेम केले. मात्र आता त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे आपण सर्वजण पुढे येत त्याच्या कुटुंबाला मदत केली पाहिजे. ”

अभिनेत्री पुढे म्हणाली की, ” दीपेश नेहमीच सेटवर असताना त्याचा मुलगा आणि पत्नी विषयी सांगत असायचा. त्याचा आपल्या मुलावर खूप जीव होता. मी एक अकाऊंट ओपन केले आहे. यात जमा होणारा पैसा दीपेशच्या पत्नीला घरासाठी दिला जाणार आहे. कृपया तुम्ही देखील मदती साठी पुढे या. ” अभिनेत्रीने असे या व्हिडिओमध्ये सांगत त्या अकाउंटची लिंक देखील शेअर केली आहे.

दीपेशवर ५० लाखांचे कर्ज आहे. भाभिजी घर पर है या मालिकेतून त्याला खूप प्रसिध्दी मिळाली. २३ जुलै रोजी जेव्हा तो जिमला जात होता तेव्हा क्रिकेट खेळण्यासाठी तो मध्येच थांबला. त्यानंतर त्याला चक्कर आली. त्यामुळे तो खाली पडला. ब्रेन हॅमरेजमुळे त्याचे निधन झाल्याचे त्याचा मित्र आसिफ शेख याने सांगितले होते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *