ऑस्ट्रेलियाच कर्णधार पद पॅट कमिन्सकडे

 

ऑस्ट्रेलिया | काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध आफ्रिका असा क्रिकेटचा सामना रंगला होता. अशावेळी आफ्रिकेन भारताविरुद्ध कर्णधार पद बदललं होत. आता ऑस्ट्रेलियाची देखील अशीच खेळी पहायला मिळतेय. सुरू असलेल्या T 20 सामन्यात भारताविरुद्ध T 20 सामन्यात फिंच ऐवजी स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाच कर्णधार पद स्वीकारणार आहे. कर्णधारपदासोबतच एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची जबाबदारीही पॅट कमिन्सच्या खांद्यावर असेल.

 

पॅट कमिन्स आधीच ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळत आहेत. मायदेशात सुरू होणाऱ्या T20 विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियन संघाला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. ही देखील होम सीरिज राहील. या मालिकेतून 29 वर्षीय पॅट कमिन्स वनडे फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाचा पदार्पण करताना दिसणार आहे. तर टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये ऍरॉन फिंच ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.

 

कमिन्सन गेल्या महिन्यात क्रिकेटला केला राम राम; कमिन्स क्रिकेटमधून निवृत्त :

दरम्यान याआधी ऑस्ट्रेलियन वनडे संघाचे कर्णधारपदही आरोन फिंच सांभाळत होते. मात्र गेल्या महिन्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यामुळेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला वनडे फॉरमॅटसाठी संघाचा नवा कर्णधार नियुक्त करावा लागला. या चर्चेनंतर बोर्डाने पॅट कमिन्सकडे कमान सोपवली. फिंचने आपला 146 वा आणि शेवटचा वनडे सामना न्यूझीलंडविरुद्ध केर्न्स येथे खेळला. मात्र, फिंच T20 क्रिकेट खेळत राहणार आहे.

 

आयपीएल स्टार पॅट कमिन्स:
पॅट कमिन्सने इंडियन प्रीमियर लीग मध्येही आपली धार दाखवली आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला आहे. कमिन्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये 42 सामने खेळले असून 42 विकेट्स घेतले आहेत. कमिन्स गेल्या सामन्यात फक्त केकेआरकडून खेळला. मात्र दुखापतीमुळे तो या सामन्यातून बाहेर पडला.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *