मुंबई | ‘अवघाचि हा संसार’ या टीव्ही मालिकेमधून प्रेक्षकांच्या घरा घरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता सुभाष 43व्या वर्षी आई होणार आहे. अमृता सुभाषने इन्स्टाग्रामवरून एक फोटो पोस्ट करून ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. बातमी कळताच अमृता सुभाषच्या चाहत्यांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

अमृता सुभाष आणि तिची नवरा अभिनेता दिग्दर्शक संदेश कुलकर्णी दोघे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याविषयी लिहित असतात. एकमेकांचं कौतुक करत असतात. सध्या दोघे ‘पुनश्च हनिमून’ या नाटकात काम करत आहेत.

 

नाटकाच्या दौऱ्यादरम्यानचे अनेक मजेशीर किस्से आणि व्हिडीओ दोघेही शेअर करत असतात. अमृताची ही पोस्ट पाहून दोघांनी वयाच्या 43व्या वर्षी आई वडील होण्याचा निर्णय घेतल्यानं सर्वचं दोघांचं कौतुक करत आहेत. मात्र मी आई होणार आहे किंवा घरी पाळणा हलणार आहे याबाबत दोघांनीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.

अमृतासह या अभिनेत्रीनेही शेअर केली पोस्ट:
ओह… द वंडर बिगन असं कॅप्शन देत अमृतानं प्रेग्नंसी टेस्टचा पॉझिटिव्ह रिपोर्ट शेअर केलाय. अमृताच नाही तर नित्या मेननने देखील हीच पोस्ट शेअर केली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *