बायको सासरी येत नसल्याने पती गेला डिप्रेशनमध्ये, नंतर काकीला घेऊन रूममध्ये गेला अन् पुढे जे घडलं ते पाहून धक्काच बसेल

उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका महिलेचा विनाकारण मृत्यू झाला आहे. पती पत्नीच्या भांडणात या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. विकास नावाच्या एका तरुणाने आपल्या काकीवर बंद खोलीत क्रूर प्रकार केला. ६ तासांनी दरवाजा उघडला गेला तेव्हा सर्वजण हवालदिल झाले.

शाहपूरा येथे राहणारा विकास आपल्या पत्नीच्या आठवणीत अगदी वेडा झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याचे आणि त्याच्या पत्नीचे भांडण झाले होते. त्यामुळे ती रुसून माहेरी रवाना झाली होती. त्याला पत्नीची खूप आठवण येत होती. त्याने पत्नीला समजावले. मात्र त्याची पत्नी परत येण्यास तयार नव्हती.

त्यामुळे तो आपल्या काकी कडे गेला. काकीला विकासने पत्नीला परत बोलवण्याची विनंती केली. मात्र काकीने त्याचे काहीच ऐकले नाही. गुरुवारी त्याचा पारा अधिक वाढला. त्याने पुन्हा काकीचे घर गाठले. यावेळी घरात आजी देखील होती. त्याने पुन्हा एकदा काकीला विचारले आणि पत्नीला बोलावून आणण्याचा हट्ट केला. यावेळी त्याने काकिला एका खोलीत नेले आणि खोलीचे दार बंद केले. तो काकीशी भांडण करू लागला. मात्र त्याच्या स्वभावामुळे काकीने त्याच्या पत्नीला बोलावण्यास नकार दिला. यावेळी बंद खोलीचे दार तो उघडत नव्हता. आजीने त्याला खूप विनंती केली यावेळी आजूबाजूच्या व्यक्ती देखील आल्या.

त्यांनी लोकांडी दार खूप ठोठावले मात्र त्याने दार उघडले नाही. अखेर काहींनी त्याच्या पत्नीला फोन करून बोलवून घेतले. रात्री ११ ला त्याची पत्नी तिथे दाखल झाली. सुमारे सहा तास काकी आणि तो एका खोलीत बंद होते. पत्नी आल्यावर त्याने दार उघडले. त्यावेळी जे दिसले ते पाहून सर्व जण घाबरले. त्याने आपल्या काकीवर चाकूने वार केले होते. तसेच दरवाजा उघडताना त्याने स्वतःच्या पोटात देखील चाकू घुसवून घेतला. यावेळी काकी आणि त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. यात काकीचा मात्र मृत्यू झाला. तर विकासवर उपचार सुरू आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *