मराठी अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर! लग्नाचा सोहळा साजरा होताच या अभिनेत्रीच्या आयुष्यातून निघून गेली ही खास व्यक्ती; जाणून धक्काच बसेल

मुंबई| मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कधी तिच्या साधेपणाने केलेल्या लग्नामुळे चर्चेत असते तर कधी हनिमून डायरीतील बोल्ड फोटो शेअर करून लक्ष वेधते. लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला दुसऱ्या लग्नाचा बार उडवून ओटीटीवर झळकण्याची संधीही सोनाली साधते. पांडू, तमाशा लाइव्ह या सिनेमांच्या दणदणीत यशासोबत रिल्सचा धुरळा उडवत सोशलमीडियावर लाखो लाइक्सही सोनाली घेते. नुकताच सोनालीने पहिल्या लग्नाचा दुसरा सोहळा दिमाखात साजरा केला.

हा सोहळा होतो न होतो तोवर सोनालीच्या आयुष्यातील एक खास व्यक्ती मात्र तिला कायमची सोडून गेली. ती व्यक्ती कोण हे तिने सोशलमीडियावर व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांचेही डोळे पाणावले.

सिनेमा, वेबसीरीज, रिअॅलिटी शो अशा प्रत्येक माध्यमात प्रचंड सक्रिय असलेल्या सोनाली कुलकर्णीची गेल्या काही दिवसात चर्चा सुरू आहे ती तिच्या लंडनमध्ये झालेल्या लग्नाची. खरंतर गेल्यावर्षीच्या मे महिन्यात सोनाली आणि कुणाल बेनोडेकर यांनी दुबईतील एका मंदिरात साधेपणानं लग्नं केलं.

पण हळदी, मेहंदी, संगीत, अक्षता, सप्तपदी या विधी सोनालीला हव्या होत्या. सोनालीने ही कसर भरून काढत लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी लंडनमध्ये विधीवत लग्नं केलं. सोनालीच्या लग्नाचा हा सोहळा ओटीटीवर प्रदर्शित झाला. एखाद्या सेलिब्रिटीचा लग्नसोहळा ओटीटीवर प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ होती. या लग्नासाठी सोनालीचं सगळं कुटुंब, मित्र परिवार लंडनमध्ये एकत्र जमला होता.
गेला आठवडा सोनाली तिच्या लग्नसोहळ्याच्या प्रमोशन आणि रिलीजनंतरच्या आनंदात असतानाच रविवारी सोनालीला धक्का देणारी घटना घडली.

सोनालीच्या आजी सुशीला कुलकर्णी यांचं निधन झालं. सोनाली तिच्या आजीची खूप लाडकी असल्याचं तिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमधून दिसत आहे. सोनालीच्या लग्नातील विधींच्या व्हिडिओमध्ये आजींचा उत्साह चाहत्यांना पहायला मिळाला. सोनाली तिच्या आजीसोबत डान्सही करत आहे. या व्हिडिओमध्ये सोनालीने तिच्या लहानपणातील तसेच घरात आजीसोबत काही क्षण शेअर केले आहेत. सोनालीने या व्हिडिओसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, आजी तू कायम आमच्यासोबत राहशील, आम्ही असेपर्यंत.

सोनाली नेहमी तिच्या कुटुंबीयांविषयी दिलखुलासपणे बोलत असते. लग्नानंतरही लंडनमध्ये सासरी गेल्यानंतर सोनालीने पहिल्यांदा तांदळाची खीर बनवली होती. तिच्या सासूबाईंनी तिला खीर बनवायला शिकवली तेव्हा तिने सासूबाईंचं कौतुक केलं होतं. सोनालीची आई पंजाबी असून तिच्या पाककौशल्याचंही ती कौतुक करत असते.

लग्नानंतर कुणालसोबत ती मालदीव आणि मॅक्सिकोला हनिमून साजरा करण्यासाठी गेली होती, तेथील सोनालीचे हॉट फोटो खूप व्हायरल झाले होते.

सोनालीच्या आयुष्यात सध्या आनंदाचे दिवस सुरू असताना तिची लाडकी आज्जी सोडून गेल्याने ती दु:खी झाली. सोनालीने शेअर केलेल्या व्हिडिओ पाहून चाहत्यांनाही दु:ख झालं आहे. आजीच्या जाण्याने सोनालीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, पण आजीच्या आठवणी मात्र सोनालीसोबत कायम राहणार आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *