अनुराग कश्यपची घसरली जीभ, म्हणाला, ” तापसी पेक्षा माझे स्त’न…..”

मुंबई | अभिनेत्री तापसी पन्नू ही साऊथ इंडस्ट्री मधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. आजवर तिने साऊथमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलीवूड देखील खूप गाजवले आहे. अभिनयात तिने तिच्या बरोबरीच्या अनेक अभिनेत्रींना मागे टाकेल आहे.

नेमका कोणता चित्रपट निवडायचा याचा ती स्वतंत्र विचार करते. त्यामुळेच तिचे चितपट खूप गाजतात. आजवर तिने निवडलेल्या प्रत्येक चित्रपटाची स्टोरी ही खूप वेगळी आणि वेगळ्या अँगल मधील राहिली आहे. ती सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असते. आजवर तिने बॉलीवूडमध्ये देखील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तिचा हसीन दिलरुबा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यात तिने दमदार अभिनय केला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे अनेक मोठ्या कलाकारांनी देखील प्रचंड कौतुक केले होते. तापसी सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. कोणताही मुद्दा असला तरी ती त्यावर बेधडक उत्तरे देत असते.

एखाद्या ठराविक मुद्यावर आपले मत मांडताना ती कधीच बाकीचा विचार करत नाही. ती नेहमीच तिच्या मनाला पटेल ते समोरच्या व्यक्तीला सांगत असते. अशात आता ती सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कलाकार सोशल मीडियावर काही वक्तव्य केल्याने ट्रोल होतात. यात आता नावीन्य असे काही राहिले नाही.

नेहमीच प्रत्येक कलाकाराला त्याच्या वेगवेगळ्या वागण्यावरून ट्रोल केले जाते. अशात आता तापसीला देखील एक दिग्गज दिग्दर्शका बरोबर ट्रोल केले जात आहे. मात्र यावेळी तिने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. एक दिग्दर्शकाने तिच्या विषयी एक वक्तव्य केले आहे. यामुळे तिला देखील ट्रोल केले जात आहे.

अनुराग कश्यप दिग्दर्शित दोबारा या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतं आहे. यामध्ये तापसीने मुख्य भूमिका साकारली आहे. अशात हे दोघे सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहेत. एका शो मध्ये मुलाखत देत असताना अनुरागने तापसी विषयी एक वक्तव्य केले आहे. त्याचे हे स्टेटमेंट ऐकून दोघेही ट्रोलिंगच्या निशाण्यावर आले आहेत.

सिद्धार्थ कननच्या एका टॉक शो मध्ये तापसी आणि अनुराग आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहचले होते. यावेळी हे तिघे रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर भाष्य करत आहेत. यावर अनुराग म्हणतो की, सध्या gst कडे दुर्लक्ष व्हावं म्हणून बॉयकॉट बॉलीवुडचे ट्रेंड आणले आहे. यावर सिद्धार्थ म्हणतो की, तुम्ही दोघांनी देखील एक न्यूड फोटोशूट केले पाहिजे.

यावेळी अनुरागने दिलेल्या प्रतिक्रियेवरून मोठा गोंधळ उडाला आहे. कारण त्याने यात तापसी विषयी चक्क एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. यात सुरुवातीला तापसी म्हणत आहे की, मला आता पुन्हा काही हॉरर शूट नको आहे. यावेळी सिद्धर्थ तिला म्हणतो की, अनुराग तुझ्या पेक्षा जास्त चांगला दिसेल म्हणून तू असं म्हणत आहे. यावर अनुराग म्हणतो की, हो माझे स्तन देखील तिच्या पेक्षा मोठे आहेत….

त्याच्या या वक्तव्यावर शो मध्ये तापसी देखील हसताना दिसत आहे. अगदी मस्करीमध्ये या तिघांचा हा संवाद सुरू आहे. मात्र असे असले तरी अनेक नेटकऱ्यांना हे आवडलेले नाही. त्यामुळे त्या दोघांवर मोठी टीका होतं आहे. हा काय मजाकचा विषय आहे का? विनोद करण्यासाठी काही कराल का? असे अनेक प्रश्न त्यांना विचारले जात आहेत. या शो मधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *