अनु मलिक यांची मुलगी दिसते खुपचं सुंदर; करते हे काम

मुंबई | अनु मलिक हे संगीत जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. ते लोकप्रिय संगीतकार तसेच गायक आणि संगीत निर्माते आहेत. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी अनेक मोठे पुरस्कार देखील जिंकले आहेत. एवढेच नाही तर सर्वात लोकप्रिय टीव्ही रियालिटी शो इंडियन आयडॉलचे ते जजही राहिले आहेत.

अनु मलिक सोबत त्यांची मुलगी अनमोल मलिक देखील खूप चर्चेत असते. अनु मलिक यांना दोन मुली आहेत, पहिल्या मुलीचे नाव अनमोल आणि दुसरीचे अदा असे आहे. अनु आपल्या दोन्ही मुलींवर खूप प्रेम करतात.

नुकतेच अनमोल मलिकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फोटो पाहून समजते की, कधी ती फोटोशूट करताना दिसत आहे तर कधी ती तिच्या कामातून वेळ काढून फोटो क्लिक करताना दिसत आहे.

चाहते या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. अशात एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे की, “व्वा, तू खूप सुंदर आहेस.” तर दुस-या चाहत्याने कमेंट करत म्हटले की, “मला विश्वास बसत नाही की मुली इतक्या मोठ्या झाल्या आहेत. ”

अनु मलिक यांची मुलगी अनमोल ही एक लोकप्रिय गायिका आणि लेखक देखील आहे. तसेच तिला गीतकार म्हणून देखील ओळखले जाते. अनमोलने अनेक मोठे पुरस्कारही आपल्या नावावर केले आहेत.

 

एवढेच नाही तर ती अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये देखील शाभगी झाली आहे. अनमोल सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते. तसेच, ती तिच्या दैनंदिन घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही. चाहत्यांना देखील तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी जाणून घ्यायला खूप आवडते.

 

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *