वॉर्नरच्या नावे आणखी एक मोठा विक्रम; या यादीत गेला दुसऱ्यास्थानी, तर अव्वलस्थानी विराट कोहली कायम

ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 8 धावांनी विजय मिळवला. मात्र, असे असले, तरीही ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद फलंदाज डेविड वॉर्नर हा मात्र चांगलाच चमकलाय. त्यान या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना चोप देत अफलातून अर्धशतक झळकावले. या अर्धशतकामुळे त्याच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झालीय. आहे. यासह त्यान अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकलय.

या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंड संघान 6 विकेट्स गमावत 208 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून सलामीला धाकड फलंदाज डेविड वॉर्नर उतरला होता. वॉर्नरने 44 चेंडूत 73 धावा करत अर्धशतक केलंय. त्यान 2 षटकार आणि 8 चौकार मारले. या अर्धशतकामुळे वॉर्नर पराभवाच्या टी20 सामन्यात सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याच नाव झालय.

याबाबतीत वॉर्नरने फाफ डू प्लेसिस याची बरोबरी केलीय. डू प्लेसिस यानेही पराभूत झालेल्या सामन्यांमध्ये फलंदाजी करताना 8 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या. त्यामुळे दोघेही संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहेत. या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी आहे. विराटने पराभवाच्या टी20 सामन्यांमध्ये आतापर्यंत 10 वेळा 50 पेक्षा अधिक धावा चोपल्या आहेत. या यादीत संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी बाबर आझम, एच मसकाद्जा आणि निकोलस पूरन या खेळाडूंचा समावेश आहे.

त्याच्या एकूण 1768 धावा आहेत. तसेच, अव्वलस्थानी विराट कोहली असून त्याच्या 1901 धावा आहेत. आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्येही वॉर्नरने खास कामगिरी केलीय.

 • पराभवाच्या टी20 सामन्यात सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा करणारे खेळाडू ; विराट अव्वल
  10 वेळा – विराट कोहली
  8 वेळा – डेविड वॉर्नर
  8 वेळा – फाफ डू प्लेसिस
  7 वेळा – बाबर आझम
  7 वेळा – एच मसकाद्जा
  7 वेळा – निकोलस पूरन
Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *