‘नजर हटी दुर्घटना घटी’ त्या एका अपघाताने बॉलिवूड मधील या प्रसिध्द अभिनेत्याचे आयुष्य केलं बर्बाद

मुंबई | बॉलिवूडमध्ये आजवर अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले. यातील काही कलाकार खूप लवकरच प्रसिध्दी झोतात आले. मात्र काहींना आपली प्रसिध्दी तशी टिकवून ठेवता आली नाही. त्यातीलच एक अभिनेता चंद्रचूड सिंग. ११ ऑक्टोबर रोजी त्याचा वाढदिवस असतो. त्याने आजवर अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. मात्र एक काळ असा आला ज्यात त्याला स्वतःहून अभिनय क्षेत्र सोडावे लागेल. आज या बातमीमधून चंद्रचूड विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

११ ऑक्टोबर १९६८ रोजी चंद्रचूडचा जन्म झाला. “तेरे मेरे सप्ने” हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सांभाळले होते. या चित्रपटात त्याचा अभिनय तितकासा वाईट नव्हता. मात्र त्याचा पाहिला चित्रपट चालला नाही. त्यानंतर तो माचिस या चित्रपटात झळकला.

यात त्याने तब्बू बरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्याचा हा चित्रपट खूप गाजला. त्यानंतर “क्या कहणा” या चित्रपटात देखील त्याचा अभिनय पाहायला मिळाला. त्याने ऐश्वर्या राय बरोबर देखील स्क्रीन शेअर केली होती. जोश या चित्रपटात या दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळाली. या चित्रपटातील त्यांचा किस सीन देखील भन्नाट गाजला होता. यावेळी ऐश्वर्या आणि चंद्रचूड या दोघांची चर्चा रंगली होती.

काही चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर हा अभिनेता अभिनय क्षेत्रापासून दूर गेला. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले होते की, ” मला काम करण्याची इच्छा आहे. मात्र मला हवे तसे रोल मला मिळत नाहीत. त्यामुळे त्यांची प्रतीक्षा करत आहे. मला जे रोल करायचे आहेत तसे मला मिळाल्यास मी नक्कीच त्यात काम करेल.” या नंतर तो एक दोन चित्रपटांमध्ये दिसला. मात्र नंतर तो चित्रपट सृष्टीतून पूर्णतः गायब झाला. नंतर अशी माहिती समोर आली की त्याचा एक भीषण अपघात झाला आहे.

चंद्रचूड हा साल २००० मध्ये गोव्याला गेला होता. यावेळी एका नावेत तो बसला होता. याच नावेचा एक मोठा अपघात झाला. या अपघातात त्याच्या खांद्यवर खूप मार लागला. यात त्याला खूप दुखापत झाली. त्यामुळे पुढे त्याला चित्रपटांमध्ये काम करता आले नाही. या अपघातनंतर त्याला ठीक होण्यासाठी १० वर्षांचा काळ लोटला.

अपघात झाल्यानंतर त्याने एका साईटला मुलाखत दिली होती. त्यावेळी आपल्या अपघाताविषयी त्याने सांगितले की, ” मी या अपघातामुळे खूप खचून गेलो होतो. मला काहीच काम करता येत नव्हते. मात्र यावेळी माझी पत्नी आणि मुलगा यांनी मला मोलाची साथ दिली. ते मला नेहमी म्हणायचे की, काही झाले तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत”

अपघातातून ठीक झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा अभिनयाचे दार ठोठावले यावेळी “चार दीन की चांदणी” या चित्रपटात तो दिसला. मात्र त्याचा हा चित्रपट पूर्णतः फ्लॉप झाला. त्यानंतर सुष्मिता सेन बरोबर तो “आर्या” या वेब सिरीजमध्ये दिसला. या सिरिजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. चंद्रचूडला अभिनयाबरोबरच संगीताची देखील आवड आहे. त्याने शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *