दुःखद; शूटिंग दरम्यान झाला अपघात ; ‘तारक मेहता का उलटा चश्मा ‘ मधील चंपक चाचा नाही रा…

सोनी वाहिनीवरील सगळ्यात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने आजवर अनेक प्रेक्षकांचे न थांबता मनोरंजन केले आहे. मनोरंजनाच्या बाबतीत एक मोठा यशाचा टप्पा या मालिकेने गाठला आहे. परंतु नुकत्याच समोर आलेल्या माहिती नुसार, या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे.

 

आपण याआधी देखील पहिले कि फक्त जेठा आणि दयाचं नाही तर गोकुळधाम सोसायटीच्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. अश्यातच जेथे लाल याच्या वडिलांना म्हणजेच चंपक लाल यांना सेटवर एक दुर्घटनेने मोठी अशी दुखापत झाली आहे. अभिनेता अमित भट्ट यांना आपण अनेक वर्ष ‘चंपक लाल’ यांच्या भूमिकेत पाहत आलो आहे.

अधिक माहिती नुसार, आपले आवडते चंपक चाचा उर्फ अमित भट्ट यांचा मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान एक मोठा अपघात झाला आहे. त्यात त्यांना मोठी दुखापत झाली आहे. त्यांची हि दुखापत इतकी गंभीर आहे कि आता ते आपल्याला काही दिवस मालिकेत दिसणार नाहीत. डॉक्टरांनी त्यांना घरीच विश्रान्तीचा सल्ला दिला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान चंपक चाचा यांना एका सिन मध्ये धावायचे होते. या सिनच्या शूटवेळी जेंव्हा चंपक चाचा धावू लागले. तेंव्हा अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. या वेळी त्यांना मोठी दुखापत झाल्याचे बोले जात आहे. यावेळी डॉक्टरांनी त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला
यावर निर्मात्यांनी देखील अभिनेता अमित भट्ट यांना बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता काही दिवस का होईना पण चंपक चाचा आता सेटवर येणार नाहीत यामुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना आता त्यांना काही दिवस पाहता येणार नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *