अमृता सुभाष घेतला आई न होण्याचा निर्णय, म्हणाली आम्हाला मूल नकोय कारण आम्ही…….

43 वर्षीय अमृता सुभाषने आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने मराठीच नाही तर हिंदीमध्ये ही प्रेक्षकांची वाह वाह मिळवली आहे. आज देखील तितक्यात जोमाने ती मनोरंजन सृष्टीत व्यस्त आहे. नुकताच तिचा वंडर वुमन हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

त्यामुळे ती बऱ्यापैकी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिची एक बातमी व्हायरल झाली होती. त्या बातमीमध्ये असे सांगण्यात आले होते की 43 वर्षी अमृता सुभाष आई होणार आहे. आणि तसे काही फोटो तिने देखील इंस्टाग्राम वरून शेअर केले होते. त्यामुळे अनेक जण असे तर्क लावत होते की वयाच्या 43 व्या वर्षी अमृता सुभाष आई होणार.

पण हे फक्त चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केल्याचे नंतर अमृता सुभाषने कबूल केले. मात्र आता याच कारणामुळे अमृता चर्चेत आली आहे. वंडर वुमन या चित्रपटात तिने एका वयस्क महिलेची भूमिका केली आहे जी प्रेग्नें’ट होते. पण यादरम्यान तिची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

ज्यामध्ये तिला आई होण्याबाबत प्रश्न विचारले आहेत. अमृताने पतीसोबत मिळून मूल न होण्याचा निर्णय घेतला आहे. यावरूनच तिला असे प्रश्न विचारण्यात आले की, तू हा निर्णय का घेतला? आणि आई होण्याकडे तू कोणत्या नजरेने बघतेस? या प्रश्नाचे उत्तर देत ती म्हणाली की मुलं न होऊ द्यायचा निर्णय म्हणजे आजचा काळ, जो खूप बदलला आहे.

अमृता म्हणाली, “आता काळ बदलत चालला आहे. अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना मुलं आवडतात पण त्यांनी मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्यापैकीच एक आम्ही आहोत. मुलं आवडणं आणि ती वाढवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

 

आम्ही दोघंही आमच्या आमच्या करिअरमध्ये खूप व्यग्र आहोत. त्यामुळे आम्ही बाळाला वेळ देऊ शकू का? आणि त्याला न्याय देऊ शकू का? असा विचार आमच्या मनात आला. त्यामुळेच आम्ही ठरवलं की आम्हाला बाळ नको.”

 

 

पुढे ती म्हणाली, “आमच्या कामावर आमचं खूप प्रेम असल्यामुळे ते आम्ही सोडू शकत नाही. तसंच कामावरच्या प्रेमामुळे बाळाकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही. आमच्यासारखा विचार करणारे अनेकजण आहेत. परंतु आम्हाला मुलं आवडत नाहीत असा याचा अर्थ होत नाही. आमच्या मित्र-मैत्रिणींच्या मुलांवर मी खूप प्रेम करते.

 

 

मी माझी काम करून मला वेळ असेल तेव्हा त्यांच्याशी खेळायला जाऊ शकते. मी करिअरकडे ज्या पद्धतीने पाहते त्यात बाळाचं संगोपन मला करता आलं असतं का असा प्रश्न मला पडतो. बाळ आवडणं आणि त्याला जन्म देऊन त्याचं चांगलं संगोपन करणं यासाठी खूप एनर्जी लागते. ही एनर्जी आमच्यासारख्यांना इतर गोष्टींमध्ये वापराविशी वाटते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *