आमरिश पुरी यांची मुलगी दिसते खूपच सुंदर; करते हे काम

मुंबई | अमरीश पुरी बॉलिवूडच्या दहशितल एक नाव. या नावाने आजही काळजात धडकी भरावी असा वास्तवदर्शी अभिनय. अमरीश पुरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट या बॉलीवूडला दिले. एखाद्या हिरो पेक्षाही जास्त त्यांची डिमांड त्या काळी होती. त्यांच्या अभिनयाचे आजही अनेक चाहते आहेत. “जा सिमरन जा जीले आपणी जिंदगी ” , “मोग्यांबो खुश हुआ” असे अनेक डायलॉग आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

अमरीश पुरी यांनी ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘करण अर्जुन’, ‘परदेस’, ‘कोयला’, ‘मिस्टर इंडिया’, ‘नगीना’, ‘दामिनी’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यांनी अनेक भूमिका उत्तम साकारल्या. विशेषतः त्यांना खलनायकाची भूमिका जास्त मिळत होती. ते एक प्रतिभावान कलाकार होते.

अमरीश पुरी यांनी बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांचे नाव ऐकूनच चित्रपट पाहण्यासाठी तिकीटबारीवर गर्दी उफाळून येत होती. मात्र त्यांनी या जगाचा लवकरच निरोप घेतला. असे असले तरी ते जसे चित्रपटात धुमाकुळ घातल होते, तशीच त्यांची मुलगी आता सोशल मीडियावर नुसता राढा करत असते. त्यांच्या मुलीचे नाव नम्रता पुरी असे आहे. नम्रता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती सिने विश्वापासून दूर आहे. मात्र तिचा चाहता वर्ग एका सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही.

नम्रता पुरी ही अभिनय क्षेत्रामध्ये जरी सक्रिय नसली तरी तिचा मॉडेलिंगशी बऱ्याचदा संबंध आलेला आहे. ती एक फॅशन डिझायनर असल्याने अनेक कार्यक्रमांमध्ये तिने डिझाईन केलेले कपडे आग्रहाने मागवले जातात. या व्यवसायासह ती एक सॉफ्टवेअर इंजिनिअर देखील आहे. या क्षेत्रामध्ये देखील ती कार्यरत असून तिचा छंद म्हणून ती फॅशन डिझायनिंग देखील करते. सोशल मीडियावर नेहमी डिझाईन केलेल्या वेगवेगळ्या कपड्यांचे फोटो शेअर करत असते. नम्रता दिसायला देखील अतिशय सुंदर आहे. सोशल मीडिया वरतीचे लाखोच्या घरात फॉलोवर्स आहेत.

नुकतेच तिने सोशल मीडिया वरती तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अतिशय साजरी आणि सुंदर दिसत आहे. शेअर केलेला हा फोटो ट्रॅडिशनल लूकमधला आहे. गुलाबी रंगाचा ड्रेसमध्ये तिचं रूप अधिकच खुलून आल आहे. तिचे फोटो जेव्हा तुम्ही पहाल तेव्हा तुम्ही तिला पाहतच राहाल. अतिशय तेजस्वी असा तिचा चेहरा दिसतो आहे. तिचा फोटो पाहून सोशल मीडियावर अनेक जण भारावून गेले आहेत. तसेच तिच्यावर कौतुकाचा मोठा वर्षाव करत आहेत. “तुम्ही सहज कोणत्याही अभिनेत्रीला मागे टाकू शकता.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिल आहे की, ” तुम्ही खूप सुंदर आहात इतके दिवस तुम्ही कुठे होतात तुम्ही अभिनय क्षेत्रात यायला पाहिजे.” नम्रता हे दिसायला इतकी सुंदर आहे की ती सहज सध्या बॉलीवूडमध्ये असलेल्या अभिनेत्रींना मागे टाकू शकते. अशात आता ती चाहत्यांची इच्छा पूर्ण करणार की नाही हे येणारा काळच सांगेल.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *