कौन बनेगा करोडपतीमध्ये स्पर्धका पेक्षा गर्लफ्रेंडनेच केली हवा..

मुंबई | सोनी टीव्ही या वाहिनी वरती गेल्या अनेक दिवसांपासून कौन बनेगा करोडपती हा शो सुरू आहे. आतापर्यंत या शोचे १३ पर्व पूर्ण झाले असून सध्या १४ वे पर्व सुरू आहे. कोटींच्या प्रश्नांचा सवाल असलेल्या या शोमध्ये आपले नशीब आजमावायला संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून व्यक्ती येत असतात. शो सुरु झाल्यापासून याचे सूत्रसंचालन बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन करत आहे. यंदाच्या पर्वामध्ये देखील अमिताभ बच्चन हेच हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला प्रश्न विचारताना दिसतात. या रियालिटी शोची लोकप्रियता प्रचंड आहे.

प्रत्येक व्यक्तीला करोडपती व्हायचे असते. प्रत्येक जण हे स्वप्न पाहतो. मात्र क्वचित काही व्यक्ती आपले स्वप्न पूर्ण करू शकतात. अशात सध्याच्या युगात अनेक मुलं-मुली लग्नाआधीच एकमेकांना डेट करत असतात. एकत्र राहतात एकत्र वेगवेगळी स्वप्न पाहतात. अशात हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकाची या शोमध्ये लव स्टोरी चांगलीच चर्चेत आली.

शोमध्ये सुरू असलेल्या प्रश्नांपेक्षा या मुलाच्या लव्ह स्टोरी कडे सर्वांचे लक्ष वेधले. अमिताभ बच्चन यांनी त्याला विचारलेले प्रश्न पाहता त्याच्या लव स्टोरी विषयी जाणून घ्यायला त्यांना किती उत्सुकता होती हे दिसत आहे. 15 ऑगस्ट रोजी या शोचा जो भाग प्रदर्शित झाला त्यामध्ये त्या मुलाच्या गर्लफ्रेंडची भन्नाट चर्चा रंगली.

कौन बनेगा करोडपती या शोमध्ये बक्षिसाची रक्कम ही नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने आकारली जाते. एखाद्या ठराविक दिवसाचे अवचित्य साधत त्या रकमेवर आधारित प्रश्न विचारले जातात. अशाच 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने यावेळी 75 लाखांसाठीचा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी हॉट सीटवर आयुष गर्ग हा 27 वर्षीय मुलगा सहभागी झाला होता. यावेळी शोमध्ये त्याची गर्लफ्रेंड देखील आली होती. अमिताभ बच्चन यांनी त्याच्या गर्लफ्रेंड वरती चांगलेच विनोद केले.

आयुष प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हॉट सीटवर बसला होता त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी सुरुवातीला त्याचे स्वागत केले. कौन बनेगा करोडपतीच्या सेट वरती आतापर्यंत अनेक जन आपल्या आई वडिलांना किंवा मित्रांना घेऊन येत असतात. मात्र पहिल्यांदाच कोणीतरी आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन आलं होतं. त्यामुळे हे सर्वांसाठीच नवीन होतं.

यावेळी शो मध्ये झालेली सर्व गंमत जंमत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यशोचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये दिसत आहे की, अमिताभ बच्चन आयुष्यचे स्वागत करतात. त्यानंतर ते त्याला म्हणतात की, तू इथे कुणाबरोबर आला आहे? अमिताभ यांच्या या प्रश्नावर आयुष उत्तर देत म्हणतो की, मी माझ्या गर्लफ्रेंड बरोबर इथे आलो आहे.

यावेळी प्रत्येकाला पडलेल्या प्रश्नाप्रमाणे बिग बिना देखील प्रश्न पडतो की, आतापर्यंत इथे कोणीच आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन आले नव्हतं मात्र तू पहिल्यांदाच गर्लफ्रेंडला घेऊन हॉट सीटवर बसला आहेस यासाठी तुझे अभिनंदन. त्यानंतर बिग बींची उत्सुकता आणखीन वाढते ते त्याला म्हणतात की, तुम्ही दोघे एकमेकांना कसे भेटले. त्यावेळी आयुष्य सांगतो की डेटिंग ॲप द्वारे आम्ही दोघे एकमेकांना भेटलो. यावेळी मस्करीच्या मूडमध्ये अमिताभ बच्चन त्याला म्हणतात की, मी स्वतःसाठी नाही विचारत आहे पण, हे डेटिंग ॲप आहे तरी काय…? अमिताभ बच्चन यांच्या या प्रश्नावरती कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर एकच हशा पिकतो.

सध्या सोशल मीडियावर या शोचा प्रोमो व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहे. तेराव्या सीजन पर्यंत कौन बनेगा करोडपती या शोची बक्षीस रक्कम ही ७ कोटी रुपये एवढी होती. आता त्यामध्ये वाढ केली असून ती ७.५ कोटी रुपये एवढी झाली आहे. मात्र ही रक्कम गाठू न शकणाऱ्यांना आधी देखील 75 लाख रुपये घरी घेऊन जाता येत होते आणि आता देखील 75 लाख रुपये घेऊन घरी जाता येणार आहे.

 

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *