अमिताभ बच्चन यांचा स्वतःवर राहिला नाही ताबा? भर कार्यक्रमात जया बच्चन यांची घेतली कि’स

मुंबई | दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांचा आज 74 वा वाढदिवस. बाॅलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी आदर्श मानली जाते. जया बच्चन सिनेमात काम करत होत्या, तेव्हा खूप लोकप्रिय होत्या. त्यांच्या भूमिका लोकांना आवडायच्या. पण लग्नानंतर त्यांनी काम करणं सोडलं. त्यांना साधी राहणी पसंत असे.

अमिताभ आणि जया बच्चन यांची लव्ह स्टोरी – अमिताभ बच्चन यांना परंपरा जपणारी, पण विचारानं तितकीच आधुनिक अशी पत्नी हवी होती. जया बच्चन यांच्यात त्यांना हे गुण जाणवले होते. जया बच्चन यांचे सुंदर डोळे त्यांना आवडायचे. हृषिकेश मुखर्जी यांनी गुड्डी सिनेमात दोघांना एकत्र घेतलं आणि तिथेच त्यांची प्रेमकथा सुरू झाली.

बिग बींनी सगळ्यांसमोर पत्नीचं घेतलं चुंबन – बाॅलिवूड अवाॅर्ड सोहळ्यात नेहमीच कपल्सची हजेरी असते. अशाच एका सोहळ्यात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन आले होते. ते साल होतं 2014 त्यावेळी आनंदानं अमिताभ बच्चन यांनी सगळ्यांसमोर जया बच्चनना किस केलं होतं. हा गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि लगेच व्हायरल झाला. सर्व नेटकरी आश्चर्यचकित झाले होते. कारण असं काही बिग बींनी सगळ्यांसमोर पहिल्यांदाच केलं होतं.

लिप किस झाला व्हायरल – अमिताभ बच्चन आणि जया बच्चन बाॅलिवूडचं पाॅवरफुल कपल मानलं जातं. ते नेहमी रेड कार्पेटवर पोज देत असतात. 25 जानेवारी 2014 रोजी स्क्रीन अवाॅर्डसाठी दोघं गेले होते. त्या वेळी अमिताभ बच्चन यांना पुरस्कार मिळाला होता. तो घेण्यासाठी स्टेजवर जाताना आधी आनंदानं त्यांनी जया बच्चन यांचा लिप किस घेतला होता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *