अमिताभ बच्चन यांनी सख्ख्या भावा सोबत केली होती दुश्मनी; कारण वाचून धक्काच बसेल

मुंबई | बॉलीवूडच्या इतिहासातील सुवर्ण नावांमध्ये लेखक हरिवंशराय बच्चन यांचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. आपल्या लेखणीने त्यांनी प्रचंड प्रसिद्धी कमावली होती. हरिवंश राय बच्चन यांचे पुत्र अमिताभ बच्चन आणि अजिताभ बच्चन हे होते. आपल्या दोन्ही मुलांना हरिवंशराय बच्चन यांनी समान न्याय देत वाढवले. मात्र हरिवंश राय बच्चन यांचे निधन झाल्यानंतर या दोन्ही भावांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. ही दरी इतकी मोठी झाली की, हे दोघेही भाऊ एकमेकांबरोबर अजिबात बोलत नव्हते. इतकेच नाही तर अभिषेक बच्चनच्या लग्नावेळी देखील अजिताभ बच्चन हजर राहिले नव्हते.

अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूड मध्ये प्रचंड यश कमावले आहे. मात्र त्यांच्या यशामध्ये अजिताभ बच्चन यांचा खारीचा वाटा आहे. अजिताभ बच्चन हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत मात्र तरी देखील ज्यावेळी आपल्या भावाने अभिनय क्षेत्रात नाव कमावण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अजिताभ यांनी प्रचंड मेहनत घेतली. दिग्दर्शकांची भेट घेऊन त्यांना अमिताभ यांचे फोटो दाखवत होते. खूप वेळा रिजेक्शन आल्यानंतर एका दिग्दर्शकाने अमिताभ यांना चित्रपटात काम देण्यास संमती दर्शवली.

त्यानंतर अजिताभ बच्चन कोलकत्याला रवाना झाले. अमिताभ यांचा बॉलीवूडमध्ये हळूहळू दबदबा निर्माण झाल्यानंतर ते पुन्हा एकदा मुंबईत आले. इथे येऊन त्यांनी अमिताभ बच्चन यांचे सर्व कामकाज पाहण्यास सुरुवात केली. कोणते चित्रपट नाकाराचे कोणते स्वीकारायचे आणि किती मानधन घ्यायचे हे सर्व अजिताभ बच्चन ठरवत होते. काही दिवसांनी अजिताभ यांनी स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. यावेळी ते आपल्या पत्नीबरोबर लंडनला रवाना झाले. इथे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यामध्ये यश संपादन केले.

कालांतराने अमिताभ बच्चन यांची राजकीय व्यक्तींबरोबर जवळीक वाढू लागली. तसेच बोफोर्स घोटाळ्यामध्ये त्यांचे नाव अडकले गेले. याचा फटका अजिताभ यांच्या कंपनीवर देखील पडला. दोन्ही भावांची यावेळी कसून चौकशी करण्यात आली. नंतर या घोटाळ्यामध्ये दोघांना देखील क्लीन चिट दिली गेली. मात्र यामुळे या दोघांमध्ये मोठी तेढ निर्माण झाली. अजिताभ यांना अमिताभ यांचे असे वागणे अजिबात आवडले नाही. त्यामुळे हे दोन्ही भाऊ एकमेकांपासून दुरावले गेले.

त्यानंतर पुन्हा एकदा अजिताभ बच्चन आपल्या पत्नी रमोला यांच्याबरोबर लंडनला रवाना झाले. साल 2007 मध्ये त्यांनी पत्नी बरोबर घटस्फोट घेतला. तसेच ते भारतामध्ये पुन्हा आले. अजिताभ यांना एक मुलगी आणि तीन मुले आहेत. त्यांच्या मुलीने आयुष्याचा जोडीदार म्हणून कुणाल कपूर या अभिनेत्याची निवड करत त्याच्याबरोबर लग्न केले आहे. अजिताभ यांची मुलगी नैना हिच्या लग्नात अमिताभ बच्चन आणि त्यांचे भाऊ एकत्र आले. या लग्नामुळेच या दोन भावांमधील भांडणे मिटली आणि पुन्हा एकदा हे दोघे पूर्वीसारखे बोलू लागले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *