चार नवीन मालिकांसह झी मराठीवर आणखीन एका नवीन मालिकेची भर

मुंबई| झी मराठी ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला वेगवेगळे आणि नवीन विषय असलेल्या मालिका घेऊन येते. या वाहिनीवर चार नवीन मलिका लवकरच सुरू होणार आहेत. या मालिकांची नावे आणि प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर झाली आहे. अशात प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखीन भर टाकणारी आणखीन एका मालिकेचे नाव समोर आले आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘आप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये अभिनेत्री श्वेता शिंदे ही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. श्वेताने स्वतः या मालिकेची घोषणा केली आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याविषयी पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. मात्र या विषयी अधिक अपडेट मिळवण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

श्वेता शिंदेने लगिर झालं जी या मालिकेत देखील दमदार अभिनय केला. तिचा या मालिकेतील अभिनय पाहून तिला मिसेस मुख्यमंत्री या मालिकेत कास्ट केले गेले. ही मालिका देखील तिने चांगली गाजवली. लागिर झालं जी आणि मिसेस मुख्यमंत्री या दोन्ही मालिकांनी तिला खूप प्रसिद्धी मिळाली. शिवाय तिच्या पदरी आता आणखीन एक नवीन मालिका देखील आली.

‘आप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत एका स्त्रीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. कलेक्टर होण्यासाठी एक महिला तिच्या कुटुंबाचा आणि सर्व मंडळींचा कसा सांभाळ करते. तिच्या मार्गात मोठे काटे असून ती कशी सावरते या सर्व गोष्टी यामध्ये दाखवल्या जाणार आहेत. मालिकेत श्वेता शिंदे असणार आहे हे समजल्याने अनेक चाहते खुश झाले आहेत. तसेच ही मालिका सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

झी मराठी वरील किचन कल्लाकार, मन उडू उडू झालं, बँड बाजा वरात आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं  या मालिका लवकरच बंद होत आहेत. या मकिकांबरोबर आता सत्यवान सावित्री ही मालिका देखील लवकरच बंद होईल अशी देखील चर्चा सुरू आहे. कारण या मालिकेचा टीआरपी खूप कमी आहे. झी मराठी वाहिनीवर लवकरच तू चाल पुढं, नाव गडी नवं राज्य, बस बाई बस आणि डान्स महाराष्ट्र डान्स हे नवीन कार्यक्रम सुरू होत आहेत. अशात यामध्ये आता ‘आप्पी आमची कलेक्टर’ हा आगामी मालिकेची देखील भर पडत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *