एवढं मोठं सत्य, आलियाच्या प्रेग्नेंसीची नुसती अफवा होती…. रणबीरने केला खुलासा

मुंबई | रणवीर कपूर आणि आलिया भट अभिनेता ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. यासाठी रणबीर आणि आलिया दोघेही चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. अशातून नुकतीच आली आहे तिच्या प्रेग्नेंसी बद्दल एक गोड बातमी सगळ्यांना दिली. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर सोनोग्राफी करतानाचा एक फोटो पोस्ट केला. तसेच तिने लिहिले की रणबीर आणि मी लवकरच आई-बाबा होणार आहे. तिने दिलेल्या या गोड बातमीमुळे सर्वत्र तिच्या येणाऱ्या बाळाची चर्चा आणि उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर सतत आलियाच्या प्रेग्नेंसीची चर्चा होताना दिसते. अशात तिने ही बातमी दिल्यानंतर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही जण या दोघांना ट्रोल करताना दिसत आहेत.

काही व्यक्तींचं असं म्हणणं आहे की, आलिया तिच्या आगामी ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रेग्नेंसीचे नाटक करत आहे. तसेच आलिया आणि रणबीरवर वेगवेगळ्या टीका देखील केल्या जात आहेत. तर आता या सर्व ट्रोलर्सना रणबीरने चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. सध्या तो त्याच्या आगामी शमशेरा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाचा प्रमोशन निमित्त त्याने एका माध्यमाला मुलाखत दिली. यावेळी त्याला आलियाच्या प्रेग्नेंसीवर होत असलेल्या ट्रोलिंग बद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला की, “मला आणि आलियाला केवळ सगळ्यांसोबत आमचा आनंद वाटायचा होता. आलियाने मला इतकं प्रेम आणि आनंद दिलाय की कधी कधी माझ्याच मनात अपराधीपणाची भावना येते. मला बऱ्याचदा भीती वाटते हा आनंद माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना. त्यामुळे मला हे सारं काही सांभाळून ठेवायचं आहे.”

पुढे त्यांच्या नात्याविषयी सांगताना तो म्हणाला की, “आम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतो. मला आलिया खूप आवडते तिला देखील मी खूप आवडतो. आम्ही एक एकमेकांना एकत्र राहण्याचे वचन देत लग्न केलं आहे. सध्याचा काळात आम्ही आमच्या नात्यातील आनंद उपभोगत आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक चढउतार पाहिले आहेत. पण, आता आम्ही खरंच आमच्या आयुष्याच्या एका नव्या पर्वाची मज्जा घेत आहोत.” असं तो म्हणाला. रणबीरचे शमशेरा आणि ब्रह्मास्त्र हे दोन्ही मोठे बिग बजेट चित्रपट आहेत. या चित्रपटातील यश मिळवण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. तसेच या दोन चित्रपटांबरोबरच त्याचा आणखीन दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव रंजन आणि ऍनिमल या दोन्ही चित्रपटात रणबीर दमदार अभिनय करताना दिसेल.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *