‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाचां झाला अपघात, दुखापती नंतर अशी झाली अवस्था

मुंबई | सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका आज घराघरात पोहोचली आहे. मालिकेतील लतिका हे पात्र सर्वांना आवडते. अशात काही दिवसांपूर्वी लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक हिचा एक छोटा अपघात झाला. छोटा असला तरी तिच्या पायाला मोठी दुखापत झाली. त्यामुळे तिच्या पायाला प्लास्टिक सर्जरी करावी लागली.

अशात अक्षयाने महिनाभर कोणतीही तक्रार न करता काम केल आहे. मालिकेच्या बऱ्याचश्या भागांचे शूटिंग तिने पूर्ण केले आहे. मात्र अजूनही तिचा पाय पूर्णपणे बरा झालेला नाही. डॉक्टरांनी तिला आणखीन दोन महिने स्वतःच्या पायावर उभे न राहण्याचा सल्ला दिला आहे.

आता यामुळे अक्षया बरीचशी चिंतेत आहे. अक्षय खरे आयुष्यात अतिशय बिनधास्त अशी आहे. तिला स्वतंत्र जगायला आवडत. मात्र पाहायला झालेले दुखापतीमुळे तिला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत आहे. याच संदर्भात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहून तिच्याविषयी सहानुभूती वाटते. मात्र पोस्टमध्ये तिने मला कोणतीही सहानुभूती दाखवू नका असे देखील म्हटल आहे.

अक्षयने लिहिलेल्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे हे माहीत करून घेऊ. अक्षयने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती गाडीवरून फिरताना, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे पदार्थ खाताना, मजा मस्ती करताना दिसत आहे. ही व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शन मध्ये लिहिल आहे की, ” मला हवे असलेले जीवन तयार करण्यासाठी 27 वर्षे लागली.

स्वतंत्र, विनामूल्य, कर्फ्यू मुक्त जीवन, आणि हे सर्व खराब करण्यासाठी 27 सेकंदांचा अवधी देखील मोठा ठरला. बरं, माझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे, परिस्थिती कितीही कठीण असली तरीही मी सध्याच्या परिस्थितीत ठीक आहे, असं म्हणणं खोटं ठरेल. मी या काळात अडकले आहे, एक काळजी घेणारी माझे कुटुंबीय, घर आणि मित्र मंडळ आणि चांगले डॉक्टर आहेत. मी खूप आभारी आहे की मी नोकरी करते आणि तरीही काम करू शकते. पण हे su*ks. पुढचे २ महिने स्वतःच्या पायावर उभे न राहण्याचा विचार मला घाबरवतो.”

पुढे तिने लिहिले की, ” प्रवास करण्यास सक्षम होण्यासाठी पुढचे २ महिने स्वतःच्या पायावर उभे न राहणे मला घाबरवते. मी पूर्वीसारखा प्रवास करू शकत नाही, नाचू शकत नाही, किंवा साहसी खेळांमध्ये गुंतू शकत नाही, माझी स्कूटर/बाईक चालवते, मला वाटेल तेव्हा कुठल्यातरी रेस्टॉरंटमध्ये जेवायला असे काहीच करता येत नाही. 8 महिने अशी गोष्ट आहे ज्याची मला काळजी करावी लागेल असे कधीच वाटले नव्हते. पण मी इथे आहे, हे सर्व करत आहे. ”

पुढे तिने आपल्या चाहत्यांना सांगितला आहे की, “या पोस्टमध्ये खरोखर कोणताही निष्कर्ष किंवा संदेश नाही, ही केवळ वैयक्तिक पोस्ट आहे. तसेच, सर्वांना विनंती करते की सहानुभूती दाखवू नका (कारण यामुळे मला खूप आजारी वाटत आहे.) मला आत्ता स्वतःला ठीक करण्यासाठी कोणाचीही गरज नाही कारण मला माहित आहे की हे कोणीही करू शकत नाही.” डॉक्टरांनी अक्षयला पूर्णता विश्रांती घ्यायला सांगितली आहे. मात्र ती एवढी चंचल आहे की तिला ही विश्रांती घेऊ कशी असा प्रश्न पडला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *