अजित कुमारला होणार फाशी, देव माणसाचा झाला पर्दाफाश

मुंबई | झी मराठीवरील देव माणूस २ ही मालिका मोठ्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेमध्ये आतापर्यंत सुरू असलेल्या सर्व गुन्ह्यांचा पर्दाफाश होणार आहे. सतत वेगवेगळे आणि नवनवीन टेस्ट घेऊन येणारी ही मालिका आणखीनच रंजक होऊ लागली आहे. मालिकेतील ट्विस्ट थांबता थांबत नाहीये. विशेष म्हणजे इतर मालिकांमध्ये असलेले ट्विस्ट पाहून प्रेक्षक संतात मात्र देव माणूस मधील ट्विस्ट इतक्या सहजतेने दाखवले आहेत की यामधून प्रेक्षकांचे फक्त आणि फक्त मनोरंजन होते. त्यामुळे प्रेक्षक या मालिकेला मोठी पसंती देतात.

डॉ. अजित कुमार आणि इन्स्पेक्टर जामकर लवकर आमने सामने येणार आहेत. मालिकेतील या दोघांचा खेळ चांगला प्रेक्षक वर्ग गोळा करतो आहे. इन्स्पेक्टर जामकर कंबर कसून पुरावे शोधत आहेत. रात्रंदिवस ते याच कामांमध्ये गुंतलेले दिसत आहेत. त्यांचा हा शोध आता अखेर संपणार आहे आणि खरा गुन्हेगार त्यांच्या हाती लागणार आहे.

मालिकेतील खरा गुन्हेगार कोण आहे हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. मात्र आता हा गुन्हेगार जामकर यांना देखील सापडणार आहे. तसेच त्याच्या पापांचा आता घडा भरलेला त्याला फाशीची शिक्षा होताना दिसणार आहे. डॉ. अजित कुमार यांनी आतापर्यंत ज्या काही चुका केल्या आहेत त्या सर्वांची शिक्षा त्यांना मिळणार आहे. नुकताच या मालिकेच्या आगामी भागाचा एक प्रमुख व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

या प्रोमो अजित कुमार ला फाशीची शिक्षा होत असल्याचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे प्रेक्षक आता ही मालिका पाहण्यासाठी आणखीनच उत्सुक आहेत. मालिकेमध्ये एकीकडे पाहिलं तर अजित कुमारने नुकतीच त्यांच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र पुरावे नसल्याने इन्स्पेक्टर जामकर त्याला अटक करू शकत नाहीत.

त्यामुळे ते आणि त्यांची संपूर्ण टीम झाडून कामाला लागली आहे. अशात यामध्ये जो प्रमुख व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात असे दिसत आहे की, अजित कुमार त्याच्या गुन्ह्यांची कधी देतो. त्यानंतर मागून इन्स्पेक्टर जामकर म्हणतात की, ‘आता जामकर तुझा नंबर’ तसेच पुढे ते असे म्हणताना दिसत आहेत की, ” ‘काय ती रस्सी, काय तो फास, काय तो खटका, एकदम ओक्के!” हा डायलॉग सांगतात अजित कुमारच्या गळ्यासमोर फास येते. मालिकेतील हा एपिसोड रविवारी दोन तासांच्या विशेष भागात दाखवण्यात येणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *