सलमान खान नंतर अनिल अंबानीच्या प्रेमात होती ऐश्वर्या; ते फोटो व्हायरल

मुंबई | बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही सध्या आपल्या अभिनयाच्या कारकिर्दी पासून दूर आहे. मात्र तरी देखील तिच्या विषयी माध्यमांवर अनेक चर्चा होत असतात. ऐश्वर्या सध्या सोशल मीडियावर देखील फारशी सक्रिय नसते. असे असले तरी सध्या तिच्या आयुष्यातील काही जुन्या किस्स्यांमुळे आजही ती चर्चेचा विषय बनलेली असते. आज या बातमीमधून तिच्या आयुष्यातील असेच काही रंजक किस्से जाणून घेणार आहोत.

ऐश्वर्या ही एक भन्नाट सुंदर अभिनेत्री आहे. आपल्या सुंदरतेचे तिने अनेकांच्या काळजात आपले पक्के स्थान निर्माण केले होते. यामध्ये तिचे नाव बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉय बरोबर देखील जोडले गेले होते. या दोन अभिनेत्यांबरोबर तिचे नाव जोडले गेले त्यावेळी अनेक चर्चेला उधाण आले. अशात धीरूभाई अंबानी यांचा छोटा मुलगा अनिल अंबानी याच्या बरोबर देखील तिचे नाव जोडले गेले होते.

आपल्या नात्यासाठी अनिल तिला कोटींची रक्कम द्यायला देखील त्यात झाला होता. अशी देखील माहिती समोर आली होती. मात्र यावर अनेक मुलाखतींमध्ये अभिनेत्रीने कोणतेही उत्तर द्यायला नेहमीच टाळाटाळ केली होती. असे म्हटले जात होते की, हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. यावेळी दोघांची प्रेम कहानी भन्नाट रंगली होती.

आज देखील या विषयी अनेक वेळा ऐश्वर्याला प्रश्न विचारले जातात. एकदा एका मुलाखतीत तिने यावर उत्तर दिले होते. ती म्हणाली होती की, ” माझ्या आणि अनिल विषयीच्या या चर्चा ऐकून मी थक्क झाले. तुम्हाला खरचं वाटत का आमचं असं काही असेल. माझ्या करिअरच्या प्रगती पाथावर मी कामात एवढी व्यस्त असताना मी हे सगळ कधी करू? असे प्रश्न तिने केले होते.

तसेच आमच्या विषयी सुरू आलेल्या चर्चा या फक्त अफवा आहेत असे देखील म्हणाली होती. यावेळी विवेक ओबेरॉय बद्दाल देखील तिला विचारले गेले. मात्र तिने या बद्दल बोलण्यास नकार दिला होता. सलमान खान आणि तिची प्रेम कहाणी सगळ्यांचं माहीत आहे. सलमान ऐश्वर्या साठी पार वेडा झाला होता.

एकदा मुलाखतीत ऐश्वर्या म्हणली होती की, ” आमचे ब्रेकअप झाले आहे ही गोष्ट त्याला मान्य नव्हती. तसेच तो हे स्वीकारत नव्हता. या नंतर देखील त्याने मला कॉल करून अपशब्द बोलायला सुरुवात केली होती. तसेच जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा त्याने माझ्यावर हात उचलला होता. तो अतिशय रागीट स्वभावाचा आहे.” असे तिने सांगितले होते.

अशात ऐश्वर्याला अनिल अंबानीची पत्नी टिना देखील एकदा कॉल वरून म्हटली होती की, ” तू अनिल पासून दूर रहा” अशी देखील चर्चा सुरू होती. त्यानंतर साल २००४ मध्ये ती आणखीन एका मुलाखतीत अनिल अंबानी विषयी म्हटली होती की, ” मी त्यांना खूप कमी भेटते. आम्ही प्रॉड्यूसर भारत शहाच्या बडे पार्टीला शेवटचे भेटले होतो. त्यावेळी मी आणि टिना दुसऱ्या एका टेबलवर एकत्र बसलेलो होतो. ” असे तिने सांगितले.

अशात या सर्व चर्चा सुरू असल्या तरी अनिल अंबानी त्यांचे कुटुंबीय हे ऐश्वर्याचा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबीयांचा खूप आदर करतात. कारण आराध्या ही धीरूभाई इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे. या स्कूलच्या फाउंडर नीता अंबानी आहेत. त्या आरध्याचा खूप लाड करतात. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सोहळ्यात आराध्या सहभागी असते. तसेच या वेळी ऐश्वर्या आणि अभिषेक देखील इथे हजर असतात. अंबानी कुटुंबीय आरध्याचे खूप लाड करतात. अनेक वेळा ऐश्वर्या आणि अंबानी कुटुंबीय एकत्र दिसले आहेत.

“ओर प्यार हो गया” या चित्रपटाच्या शूटिंग वेळी ऐश्वर्या अभिषेकला भेटली होती. त्यानंतर “ढाई अक्षर प्रेम के” या चित्रपटाच्या शूटिंग वेळी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर साल २००० मध्ये या दोघांचे लग्न झाले. आता दोघेही एकत्र सुखी आयुष्य जगत आहेत.

अभिषेकने त्याच्या एका मुलाखतीत ऐश्वर्या आणि त्याच्या पहिल्या भेटीबद्दल एक किस्सा सांगितला होता. त्यावेळी तो म्हणाला की, ” अमिताभ बच्चन यांच्या ” मृत्यू दास” या चित्रपटात मी प्रोडक्शन बॉयचे काम केले होते. यावेळी मला स्विझरलँडला पाठवले गेले होते. तेव्हा बॉबी आणि ऐश्वर्या त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंग साठी तिथे आले होते. त्यावेळी त्या दोघांनी मला जेवणाला बोलावले होते. तेव्हा मी ऐश्वर्या बरोबर बोलत असताना ती माझी मस्करी करत होती. ”

आता असे असले तरी हे दोघे आता पती पत्नी आहेत. तसेच त्यांना आराध्या ही मुलगी देखील आहे. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या पुन्हा एकदा आई होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र हे फक्त एक अफवा आहे हे पुन्हा स्पष्ट झाले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *