मानलं भाऊ! अवघ्या 77 चेंडूत ठोकलं द्विशतक; विंडीजच्या खेळाडूची जगभर चर्चा

क्रीडा | वेस्ट इंडिजचा क्रिकेटर रहकीम कॉर्नवॉलने अमेरिकेविरुद्ध खेळताना 77 चेंडूत 205 धावांची नाबाद खेळी केली. अटलांटा ओपन टी20 क्रिकेट टूर्नामेंट नावाच्या स्पर्धेत अटलांटा ओपनसाठी खेळताना कॉर्नवॉलने या डावात 22 षटकार ठोकुन 17 चौकार ठोकले. 140 किलोचा हा खेळाडू सध्याच्या क्रिकेट विश्वात आपल्या वजनान प्रसिद्धीस आलाय. सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, अटलांटा फायरने 20 षटकांत 326/1 अशी मोठी धावसंख्या उभारली.

2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजमधून त्यांनी कसोटीसाठी सुरुवात केली अशावेळी गोलंदाजीच्या जोरावर चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा यांच्या सारख्या फलंदाजांना त्यान बाद केलं आणि आपली ओळख दाखवून दिलीय. पण त्यानंतर त्याला वेस्ट इंडीज संघातून त्याला बसवले. आताच्या परिस्थितीत तो फलंदाजीच्या जोरावर धुमाकूळ माजवतोय.

9 कसोटीत त्यानं 238 धाव करून 34 विकेट्स घेतल्या. 64 ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात 1019 धावा आहेत आणि 29 विकेट्स घेतल्यात. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2695 धाव केल्या असून 354 विकेट्स तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 1350 धाव आणि 62 विकेट्स घेतल्या आहेत. याच्या दुहेरी शतकान 326 धावांच शिखर उभारल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरमधून खेळला होता कॉर्नवॉल – आयसीसी टूर्नामेंटबद्दल बोलायचे झाले तर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही युनिव्हर्स बॉसच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरमधून 175 धावांची इनिंग खेळली होती. कॉर्नवॉल कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस रॉयल्सकडून खेळतो.

शेवटच्या चेंडूवर झळकावल शतक – कॉर्नवॉलने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून द्विशतक पूर्ण केले. 199 धावा केल्यानंतर तो खेळत होता. त्याने षटकार ठोकला आणि टी-20 क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले. टी-20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजच्या संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *