पतीचे निधन झाल्यानंतर या अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय, अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी करणार अवयव दान…..!

दिल्ली | दाक्षिणात्या चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री मीना हिच्या पतीचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. विद्यासागर असे तिच्या पतीचे नाव असून त्याला एक गंभीर आजार झाला होता. यावेळी त्याला एका डोनरची गरज होती. त्याला फुफ्फुसांचा आजार झाला होता. मार्च महिन्यामध्ये त्याच्या या आजाराचे निदान झाले होते. यावेळी त्याच्यावरती उपचार करण्यात आले.

तसेच त्याला घरी देखील सोडण्यात आले. मात्र त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली. यामध्ये त्याची प्रकृती आणखीन खराब झाली. तसेच त्याचा फुप्फुसाचा आजार आणखीन बळावला त्यावेळी पुन्हा एकदा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र 28 जून रोजी विद्यासागरचा मृत्यू झाला.

त्याची पत्नी मीना ही तमिळ सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या पतीच्या निधनामुळे अभिनेत्री पूर्णतः खचून गेली होती. मात्र आता ती या धक्क्यातून सावरत आहे. तसेच पतीच्या निधनानंतर तिने आपल्या आयुष्यात एक मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वजण कौतुक करत आहेत.

आजारांमध्ये आणि अपघातामध्ये अनेक व्यक्तींचे अंतर्गत अवयव खराब होतात. यावेळी त्यांना एका डोनरची नितांत गरज असते. मीनाने आपल्या पतीला गमावल्यानंतर ही बाब तिच्या चांगलीच लक्षात आली आहे. त्यामुळे आता तिने अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिचे असे म्हणणे आहे की, अवयव दान केल्याने आपण एक नाही तर बऱ्याच व्यक्तींचे प्राण वाचवू शकतो. आपल्याला जिवंत राहण्यासाठीचा हा दुसरा एक मार्ग आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण कुणाला तरी जीवनदान देणे हे सर्वात मोठे पुण्याचे काम आहे. त्यामुळे हे काम सर्वांनीच केले पाहिजे.

या अभिनेत्रीने पुढे असे देखील म्हटले आहे की, कदाचित माझ्या पतीचे देखील यामुळे आयुष्य बदलू शकले असते. एक डोनर एक नाही तर आठ व्यक्तींचे प्राण वाचवू शकतो. त्याचबरोबर तो फक्त त्या व्यक्तीच्या नाही तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये आनंद पसरवू शकतो.

आपले अवयव दान करताना दान करणारी व्यक्ती त्याचबरोबर ते अवयव स्वीकारणारी व्यक्ती आणि डॉक्टर एवढीच ही साखळी नसते. या पलीकडे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील इतर व्यक्तींवर देखील या गोष्टीचा परिणाम होत असतो. माझ्या पतीच्या निधनानंतर अवयव दान करणे ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे मला समजले आहे. मला आशा आहे की तुम्हाला देखील या गोष्टीचे गांभीर्य समजले असेल.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने हे सर्व लिहिले आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेक जण तिचे कौतुक करत आहेत. तसेच तिच्या अनेक चाहत्यांनी देखील तिच्या या निर्णयाचे स्वागत करत आम्हीदेखील अवयव दान करू असे म्हटले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *