द कपिल शर्मा’ शो सोडल्यानंतर प्रसिध्द अभिनेत्यावर आलीय शेंगदाणे विकण्याची वेळ

मुंबई | बॉलिवूड मध्ये अनेक कलाकार आले आणि अनेक कलाकारांनी आप आपल्या काळात बॉलिवूड गाजवून एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि त्यानंतर काही अशा चुका केल्या की त्यामुळे त्यांना बॉलीवुड पासून दूर जावं लागलं आणि त्याहूनही त्यांच्यावर अत्यंत वाईट दिवस आल्याचे आपण पाहिले असेल.

 

कॉमेडीचे ठिकाण म्हटलं की द कपिल शर्मा हा शो तुम्हाला माहित असेल. या शो मध्ये अनेक कलाकारांनी आपल्या आयुष्याला कलाटणी मिळावी म्हणून काम केले आणि या अभिनय क्षेत्राच्या उंच शिखरावर जाऊन पोहचले आहेत. या शो मुळे अनेक कलाकार या अभिनय क्षेत्रात देखील आले आहेत. याचं शो चां एक भाग असणारा कॉमेडियन सुनील ग्रोव्हर तुम्हाला माहीतच असेल. नुकताच त्याने हा शो सोडला आहे

 

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी कॉमेडियन ॲक्टर सुनील ग्रोव्हरचा शेंगा विकतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याने स्वतः हा व्हिडिओ शेअर करत त्याला ‘खाओ खाओ’ अस कॅप्शन दिलं आहे. त्या व्हिडिओत सुनील ग्रोव्हर शेंगा भाजताना देखील दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धमाल करताना पाहायला मिळतोय. त्यामुळे चाहते एकच प्रश्न विचारू लागले आहेत.

 

 

द कपिल शर्मा हा शो सोडल्यानंतर सुनील वर एवढी वाईट वेळ आली आहे का? असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत. त्यामुळे या व्हिडिओची सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा होऊ लागली आहे. सध्या या व्हिडिओ ला लाखो visitor’s आले आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्राम, फेसबुक आणि WhatsApp च्या माध्यमातून व्हायरल होताना दिसत आहे.

 

सुनीलच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या कॉमेंट – हा व्हिडिओ काही दिवसापूर्वीचां आहे. काही चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. ते म्हणाले की पुन्हा एकदा द कपिल शर्मा जॉईन करा, तसेच काही जण म्हणाले की एवढी वाईट का वेळ आली आहे, शेंगदाणे कितीला दिले भैय्या..? अशा अनेक कॉमेंटने व्हिडिओवर वर्षाव होत आहे. परंतु तो नेहमीच असे व्हिडिओ बनवत असतो. हा व्हिडिओ त्यान मनोरंजन म्हणून बनवला होता.

 

या चित्रपटात करणार काम – कपिल शर्मा आणि सुनील या दोघांमध्ये व्ययक्तीत वाद झाला आणि त्यानंतर सुनील ने द कपिल शर्मा हा शो सोडला. या शो मुळे तो कायम चर्चेत असायचा. सुनील ने यापूर्वी अनेक चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. येत्या आगामी काळातील जवणा या चित्रपटात देखील तो झळकणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *