२० वर्षानंतर पुन्हा एकदा मिस इंडियाचा मुकुट नेहा धुपियाच्या शिरावर?

मुंबई | अभिनेत्री नेह धूपियाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने सौंदर्याचा कोणता तरी किताब जिंकला असं दिसत आहे. मात्र तीने २००२ साली मिस इंडिया हा किताब जिंकला होता. मग आता पुन्हा एकदा तिने कोणता किताब जिंकला आहे अशी चर्चा सुरू आहे. तर या बातमीतून याच विषयी जाणून घेऊ.

नेहा धुपिया या अभिनेत्रीने साल २००२ मध्ये मिस इंडियाचा किताब आपल्या नावे कोरून घेतला. त्यावेळी तिची खूप चर्चा झाली तिचे मोठे कुतुक झाले. तर ३ जुलै २०२२ रोजी मिस इंडिया २०२२ चा निकाल जाहीर झाला. यामध्ये सिनी शेट्टी विजयी झाली.

मिस इंडियाचा मुकुट तिच्या शिरपेचात रोवला गेला. मग नेहा धूपिया इथे का आली होती आणि तिचे फोटो कसे काय व्हायरल होत आहेत असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर, नेहाला मिस इंडियाचा किताब जिंकून २० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ती मान्यवरांच्या रूपात या इव्हेंटला आली होती.

तिची २० वर्षे पूर्ण झाल्याने तिला मंचावर बोलावून पुन्हा एकदा सन्मानीत करण्यात आले. त्यावेळी तिचा पती अंगर बेदी आणि तिची दोन मुल देखील मंचावर उपस्थित होती. दोन्ही मुलांची नावं मेहर आणि गुरकी अशी आहेत. या सर्वांनी या मंचावर अनेक फोटो काढले. त्यांचे हेच फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अशात अभिनेत्री दिया मिर्झाने देखील नेहाचे फोटो पोस्ट करत मिस इंडियाचे २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तिला शुभेच्छा दिल्या. साल २००० मध्ये दियाने देखील मिस मिस येशिया पॅसिफिक हा किताब जिंकला होता. त्यानंतर २००२ मध्ये नेहाने मिस इंडियाचा किताब जिंकला.

नेहाने २० वर्षे पूर्ण झाल्याने या सेलिब्रेशनचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. तसेच तिने लिहिले आहे की, “20 वर्षे एका झटक्यात गेली… पण मी डोळे मिटून विचार केला तर माझ्या मनात फक्त कृतज्ञता आहे. हा मुकुट पुन्हा रंगमंचावर परिधान करणे आणि माझ्या सर्वात मौल्यवान लोकांसोबत माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण पुन्हा जगणे शक्य होईल असे मला वाटले नव्हते.”

“20 वर्षांनंतर मी मजबूत आणि अधिक अनुभवी झाले आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी त्या प्रत्येक लहान मुलीसाठी उभी राहिली आहे जी स्वप्न पाहण्याची हिंमत दाखवते आणि त्यासाठी कठोर परिश्रम करते, त्या प्रत्येक मुलीसाठी जिला यापेक्षा काहीही नको असते.

तिच्या पालकांना अभिमान वाटावा, प्रत्येक जोडीदारासाठी जे प्रेम आणि समानतेवर आपले नातेसंबंध आधारित असेल आणि प्रत्येक आई तिची स्वप्ने जगायची आहेत आणि तिला तिची मुले तिच्या पाठीशी असावित असे वाटते याशिवाय दुसरे मला काहीही नको आहे. कधी कधी वाटते आयुष्यात जरी आपल्याजवळ मुकुट नसला तरी… आपल्या सर्वांकडे आपली स्वतःची एक वेगळी चमक आहे.” नेहा चे हे फोटो आणि कॅप्शन अनेक जण पुन्हा एकदा तिला शुभेच्छा देत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *