कौतुकास्पद! सापाने दंश केला, अन् मरता मरता १० वर्षाच्या मुलीने केले नेत्रदान

दिल्ली | काही व्यक्ती अशा असतात ज्या अगदी मारताना देखील दुसऱ्यांचा विचार करतात. आपण जरी या जगात नसलो तरी देखील आपण दुसऱ्याच्या जीवनात सुख आणू शकतो. त्यामुळे अनेक व्यक्ती नेत्र दान करतात. अशात टोके येथील मालपुरा गावात अशीच एक घटना घडली आहे. मात्र या घटनेने सर्व जण दुःखी आहेत. विशेष म्हणजे एका दहा वर्षांच्या छोट्या मुलीने मरता मरता आपले नेत्र दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालापुरा येथील एका गावात अंजली नावाची दहा वर्षांची एक गोड मुलगी आपल्या आई बाबा आणि दोन भावांबरोबर राहत होती. ती तिचे वडील पप्पू सिंह यांच्या बरोबर शेतातील घरात गेली होती. रात्री झोपलेली अताना तिला एका सापाने दंश केला. यावर ती जोरजोरात रडू लागली. सर्व व्यक्ती तिथे जमा झाल्यावर लक्षात आले की, तिला सापाने दंश केला आहे.

त्यानंतर तिला मालपुर येथील एका दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तिथे तिच्यावर उपचार होतं नव्हते त्यामुळे त्यांनी तिला जयपूर येथे नेले. तिथे गेल्यावर मुलीचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीय शोक सागरात बुडाले. यावेळी तिचे मामा देखील तिथे आले होते. मुलीच्या मामांचे नाव शंकर सिंह असे आहे. ते देखील या घटनेनं खूप खचून गेले होते.

ते आल्यावर कुटुंबीयांनी त्यांना सांगितले की, जेव्हा आम्ही तिला गाडीतून दुसऱ्या दवाखान्यात नेत होतो त्यावेळी तिने मला काही झाल्यास माझे नेत्र दान करा अशी इच्छा व्यक्त केली होती. यावर मामा म्हणाले की, हा खूप चांगला विचार आहे. आपली अंजली आज आपल्यात नाही मात्र मरतामरता तिने दुसऱ्यांचे जीवन उजलवण्याचा निर्णय घेतला आहे. हा खूप चांगला निर्णय आहे.

ती आपल्यात नसली तरी तिच्या डोळ्यानी ती हे जग कायम पाहत राहू शकते. आसे म्हणून मामाने अंजलीच्या आई वडिलांची समजूत काढली. तिचे शव ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीय दवाखान्यात गेले तेव्हा त्यांनी आम्हाला मुलीचे नेत्र दान करायचे आहेत असे सांगितले. तसेच ज्यांना तिचे नेत्र दिले जातील त्यांना देखील आम्हाला भेटायचे आहे असे घरच्यांनी सांगितले.

अंजली ही एकुलती एक मुलगी होती. तिला दोन भाऊ होते. ती इयत्ता चौथीमध्ये शिकत होती. तिचे आई वडील गरीब कुटुंबातील आहेत. मजुरी करून ते आपल्या तिन्ही मुलांचे संगोपन करत होते. गरीबी असली तरी ते खूप सुखी आयुष्य जगत होते. मात्र मुलीच्या निधनाने आता संपूर्ण कुटुंब खचून गेले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *