कौतुकास्पद! अभिनेत्री तेजश्री प्रधान करणार हा अवयव दान; मोठा निर्णय

मुंबई | “होणार सुन मी या घरची” या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने मोठी प्रसिद्धी मिळवली. या मालिकेमध्ये ती एक आदर्श सुनेच्या भूमिकेत आपल्या सर्वांना दिसली. तेजश्री दिसायला खूप सुंदर आहे. विशेष म्हणजे तिचे डोळे फार आकर्षक आहेत. सोशल मीडियावर तेजश्री नेहमीच सक्रिय असते.

अनेक वेळा ती तिचे सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर करते. अनेक चाहते तिच्या सौंदर्यबाबत बोलत असताना तिच्या डोळ्यांविषयी आवर्जून बोलतात. अनेकदा तिच्या डोळ्यांचे कौतुक केले जाते. तुझे डोळे खूप सुंदर आहेत तसेच ते बोलके आहेत असं देखील तिला अनेकांनी कमेंटमध्ये बऱ्याच वेळा सांगितल आहे.

आता अशा कमेंट आल्यावरती तेजश्रीला देखील तिचे डोळे फार आवडतात. प्रत्येक व्यक्ती ही सुंदरच असते. मात्र आपल्याविषयी जेव्हा कोणी कौतुक करतं तेव्हा आपल्याला स्वतः विषयीच प्रेम अधिक वाढत. त्यामुळे तेजश्री देखील आता स्वतःच्या डोळ्यांवर खूप प्रेम करू लागली आहे. तसेच तिने आपल्या डोळ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने गरजूंना दान केलं पाहिजे असं म्हणतात. हीच बाब लक्षात घेता तेजश्रीने नेत्रदानाचा फॉर्म भरला आहे.

आपल्या मृत्यूनंतर आपल्या या सुंदर डोळ्यांनी कायमच हे सुंदर जग पहात राहावं असं तिला वाटतं. त्यामुळेच तिने नेत्रदानाचा निर्णय घेतला. आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना हे जग पाहता येत नाही. हे सुंदर जग पाहण्यासाठी गरजेचे असलेले डोळे काहींना जन्मताच नाहीत.

अशाच व्यक्तींना हे जग पाहता यावं त्यामुळे तेजश्रीने हा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री ऑन स्क्रीनवर नेहमीच गुणी स्वभावाची दिसलेली आहे. अशात ती खऱ्या आयुष्यामध्ये देखील तितकीच गुणी आणि मनाने सुंदर असल्याचे तिने आता सिद्ध केले आहे.

अनेक कलाकार वेगवेगळ्या ब्रँडचे ॲडव्हर्टायझिंग करतात. त्याचबरोबर शासकीय योजनांचे देखील ॲडव्हर्टायझिंग करत असतात. बऱ्याचदा शासकीय सेवांची जनजागृती करताना आपल्याला कलाकार दिसतात. मग यामध्ये कोरोनाची लस, पोलिओ डोस, रक्तदान, नेत्रदान अशा अनेक गोष्टींची जनजागृती केली जाते.

हे सर्व पाहत असताना प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न नक्की येत असेल की हे कलाकार स्वतः देखील त्यांच्या आयुष्यात या सर्व गोष्टी तितक्याच गंभीरतेने पाळतात का? याच प्रश्नांची उत्तरे देणारे कृत्य तेजश्रीने केले आहे. त्यामुळे सगळीकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तिने सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत लिहिल आहे की, “मी नेत्रदान करत आहे तुम्हीही करा…” तिच्या या कार्यासाठी सर्वजण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिल आहे की, गुड गर्ल. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, तुझे डोळे ज्या व्यक्तीला मिळतील तो खूप नशीबवान असेल.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *