टेलिव्हिजनवर श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे कलाकार आता करत आहेत ही कामे

दिल्ली | आज सगळीकडे दहीहंडी फोडण्याची जय्यद तयारी सुरू आहे. काल रात्री श्री कृष्णाच्या जन्मानिमित्त जन्माष्टमीचा उत्सव देखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक कलाकार मंडळींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व जण आनंदी होते. अशात आजवर श्री कृष्णाच्या गाथेवर आधारित अनेक चित्रपट आणि मालिका आलेल्या आहेत. यातील प्रत्येक कलाकाराची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात श्री कृष्णाच्या स्थानी घट्ट बसली आहे. त्यामुळे आज या बातमीमधून श्री कृष्णाची भूमिका साकारलेले कलाकार आता आहेत तरी कुठे हे जाणून घेऊ…

सर्वदमन डी बॅनर्जी : १९९३ साली रामानंद सागर यांची कृष्णा ही मालिका खूप लोकप्रिय होती. यात श्री कृष्णाच्या अवतारात अभिनेते सर्वदमन डी बॅनर्जी दिसले होते. त्यांनी या मालिकेत श्री कृष्णाच्या भूमिकेला खूप सुंदर साकारले. त्यामुळे आजही चाहते त्यांच्या या प्रतिमेला विसरलेले नाहीत. सध्या सर्वदमन डी बॅनर्जी हे ऋषिकेश मधील उत्तराखंडमध्ये एक सेवाभावी संस्था चालवत आहेत.

सौरभ जैन : साल 2013 मध्ये देखील महाभारत ही मालिका प्रसारित झाली होती. यावेळी या मालिकेत सर्व नवीन दमाचे कलाकार होते. श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये या मालिकेत सौरभ राज्य हा कलाकार होता. सौरभ वर श्रीकृष्णाचा लूक अतिशय सुंदर दिसत होता.

यावेळी अनेक गोपिका त्याचा दिवाण्या झाल्या होत्या. या मालिकेत काम करण्यापूर्वी त्यांनी काही निवडक मालिकांमध्ये काम केले होते. मात्र महाभारत या मालिकेतील श्रीकृष्णाची भूमिका साकारून त्याच्या कारकीर्दीला मोठी कलाक मिळाली. खतरो के खिलाडी या कार्यक्रमाच्या ११ व्या पर्वामध्ये तो दिसला होता.

नितीश भारद्वाज : साल १९८८ मध्ये टीव्हीवर महाभारत ही मालिका सुरू झाली. या अध्यात्मिक मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्या काळी या मालिकेत अभिनेते नितीश भारद्वाज यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती.

महाभारत मालिकेतील सर्वाधिक पांसही याच श्री कृष्णाला मिळाली. आजही जुन्या व्यक्ती म्हणजे ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला आहे त्या व्यक्ती श्री कृष्णाच्या भूमिकेत नितीश भारद्वाज यांना पाहतात. २०१८ साली आलेल्या केदारनाथ या चित्रपटात बृजराज मिश्राच्या भूमिकेत ते दिसले होते. काही मालिकांमध्ये त्यांनी पटकथा लेखकाने दिग्दर्शक म्हणून देखील काम केले आहे.

मृणाल जैन : मृणाल हा देखील टीव्ही मालिका विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. कहानी हमारे महाभारत की या मालिकेमध्ये त्याने श्रीकृष्णाचे पात्र साकारले होते. यानंतर त्याच्या प्रसिद्धीत प्रचंड वाढ झाली. त्यानंतर त्याला अनेक मालिका आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत त्यांनी हिटलर दीदी, उतरण, बंदिनी अशा काही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. सध्या तो ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत काम करत आहे. इथे तो डॉक्टर कुणाल खेर यांची भूमिका साकारत आहे.

मेघन जाधव : थोडासा बदल थोडासा पाणी या मालिकेमध्ये रणदीप मुखर्जीची भूमिका साकारणारा अभिनेता मेघन हा देखील सुरुवातीच्या काळात श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसला आहे. 2009 मध्ये जय श्री कृष्णा ही मालिका प्रसारित झाली होती. यावेळी अनेकांनी त्याच्या भूमिकेचे कौतुक केले होते.

सौरभ पांडे : सौरभ पांडे हा कलाकार सूर्यपुत्र कर्ण या मालिकेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसला. सौरभ पांडे हा अभिनेता देखील दिसायला अतिशय सुंदर आहे. या मालिकेनंतर त्याने बऱ्याचशा मालिकांमध्ये अभिनय केला. काही वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला आहे. सध्या तो आपल्या पत्नीबरोबर सुखी आयुष्य जगत आहे. सौरभ सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. चाहत्यांना आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करतो.

विशाल करवाली : बिग बॉस ६ मध्ये झळकलेल्या विशालने ‘द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण’ या मालिकेत देखील अभिनय केला आहे. या मालिकेत श्री कृष्ण हे पात्र साकारत त्याला कौतुकाची मोठी थाप मिळाली. अभिनय क्षेत्रात सध्या तो मोठे नाव कमवत आहे. धर्म योद्धा गरूण या मालिकेत तो लवकरच आपल्याला विष्णू देवाच्या भूमिकेत दिसणार आहे. आलिया भट्ट आणि रणबिर कपूर अभिनित ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये देखील त्याने अभिनय केल्याची चर्चा आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *