‘मन उडू उडू’ मधील कलाकारांचा डान्स; व्हिडिओ व्हायरल

मुंबई | मन उडू उडू झालं ही मलिका आली ती खूप प्रसिद्ध झाली आणि ती आपल्याला सोडूनही चालली आहे. या मालिकेने खूप कमी प्रेक्षकांची मने जिंकली. यातील कथा आणि पात्र यांनी प्रेक्षकांना कधीच बोर होऊ दिले नाही. मालिकेचे यश हे खूप मोठे आहे. शिवाय चाहता वर्ग आणि टीआरपी देखील जास्त आहे.

मात्र तरी देखील ही मलिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मालिका बंद होणार याच कारण म्हणजे यातील कलाकारांना त्यांच्या इतर कामात झेप घ्यायची आहे असे कारण पुढे करण्यात आले आहे. मालिका बंद होणार असल्याने तरी दिपू आणि इंद्राला चाहते आता खूप मिस करणार आहेत.

अशात ही मालिका बंद होणार मात्र मालिकेने मोठे यश मिळवले आहे त्यामुळे मालिकेतील सर्व टीमने जंगी पार्टी केली. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशात आता या मालिकेतील टीमच्या पार्टीची जोरदार चर्चा रंगली आहे. वन लास्ट टाईम असं म्हणत यातील कलाकारांनी या मालिकेच्या टायटल साँगवर धमाकेदार डान्स केला आहे.

मालिकेच्या टायटल साँगवर नुसता धिंगाणा घातलेला दिसतो आहे. यावेळी हृता आणि अजिंक्य या दोघांची जोडी पुन्हा एकदा गाण्यावर थिरकत असलेली दिसली. कलाकारांनी वन लास्ट टाईम म्हणत खूप मज्जा केली आहे. यांचे हे व्हिडीओ पाहून चाहते देखील खुश आहेत.

कोणताही गोंधळ आणि उगच चालवायची म्हणून मालिका चालवायची अस न करता मालिकेत दिपू आणि इंद्राचा लग्न सोहळा उरकून मालिका बंद होणार आहे. त्यामुळे अनेक कलाकार आपल्या सह कलाकारां बरोबर अनेक फोटो आणि आठवणी आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. तसेच हे फोटो चाहत्यांबरोबर देखील शेअर करत आहेत. मालिका बंद होणार हे समजल्यावर चाहते फार नाराज झाले.

अनेकांनी आम्ही दुसरी कोणतीच मालिका पाहणार नाही असं म्हटलं. तर काहीही मालिका सुरू ठेवण्याची विनंती केली. मात्र ही विनंती मालिकेची टीम पूर्ण करण्यासाठी असक्षम आहे. आता असं असल तरी यातील सर्व कलाकार त्यांच्या आगामी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतील एवढं मात्र नक्की.

 

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *