अभिनेता शशांक केतकरने व्यक्त केली भावना; म्हणाला…

मनोरंजन | गेली अनेक वर्षांपासून शशांक केतकर हा आपल्या मालिकेतून एक वेगळीच छाप पाडत आहे. एवढच नाही तर तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असलेला पहायला मिळतो. ‘होणार सून मी या घरची’पासून ते आत्ताची मुरंबा या मालिकेत उत्तम भूमिका पार पाडताना दिसतो. याच मालिकेचे जवळ जवळ 200 भाग झाले आहेत. याबाबत त्यान मलिकेबाबत पोस्ट केली आहे.

काय म्हणाला शशांक ?:
बऱ्याचदा मालिका विश्वाला कमी लेखलं जात किंवा मालिकांपेक्षा चित्रपटाला उच्च समजल जात. असा एक वेगळाच समज इंडस्ट्रीत अनुभवायला मिळत असतो. याचबाबत शशांक केतकरन पोस्ट करून प्रेमानं रोष व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर मालिकेचं शीर्षकगीत असणारा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ”आज मुरंबा या आपल्या मालिकेचे 200 भाग पूर्ण होतायत. शप्पथ हा प्रवास कसा आणि कधी झाला कळलं सुद्धा नाही. संपूर्ण मुरंबा परिवार तसेच स्टार प्रवाह वाहिनी आणि तुम्हा प्रेक्षकांमुळेच हे होऊ शकलं आहे.

पुढं तो म्हणाला; बर्याचदा आपल्या कडे असं म्हंटल जातं, actors television कडे फक्त एक stepping stone म्हणून बघतात. एखादा Show करायचा आणि मग त्या नंतर फक्त films. माझे विचार थोडे वेगळे आहेत. फिल्म, web series हे करायचच पण म्हणून television ला कधीच दुय्यम लेखू नये. प्रत्येक क्षेत्राची वेगवेगळी chalanges आहेत, rewards आहेत, limitations आहेत…. पण या सगळ्या पेक्षा मोठा आणि महत्त्वाचा आहे प्रेक्षकांशी निर्माण होणारा connect! त्यामुळे यापुढे सुद्धा मी कितीही films केल्या, web series केल्या तरी सुद्धा मी पुन्हा पुन्हा television करतच राहील.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *