अभिनेता सलमान खान बिग बॉस शो होस्ट करण्यासाठी घेणार तब्बल एवढे कोटी

मनोरंजन | दबंग, सल्लू , भाई अशा अनेक नावांनी बॉलिवुडमध्ये चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे सलमान खान होय. सद्या कलर्स टिव्हीवर गेले अनेक वर्षांपासून बिग बॉस रियालिटी शो टेलिकास्ट होत आहे. हा बिग बॉसचा ( Big boss) 16 वा सीजन आहे. मंगळवारी पत्रकार परिषद झाली. तेव्हा यात सलमान हा शो होस्ट करेल की नाही? तसेच सलमान नक्की किती फिस् आकारतो याची चाहत्यांना उत्सुकता असतेच. त्याच त्यान मजेशीर उत्तर दिलं.

पत्रकार परिषदेत सलमान खान यंदाच्या बीग बॉसच्या शोसाठी 1000 कोटी रुपये घेणार का? असा प्रश्न केला. तेव्हा सलमान हसत म्हणाला की ; मला जर इतके पैसे मिळाले असते तर मी आयुष्यात काम केलं नसत. मी इथ काम करतो आणि दुसरीकड जाऊन वकिलांना पैसे देतो. 1000 कोटींच्या फीबद्दल ऐकल्यानंतर आयकर विभागाचे लोक माझ्या घरी आले आणि चेक केले. नंतर त्यांना सत्य कळले की माझ्याजवळ काय आहे’ असेही सलमान खान म्हणाला.

बिग बॉस सीजन हा शो 16 होस्ट करणार नसल्याच्या अफवा पसरल्या जात होत्या. या अफवांवर सलमानने प्रतिक्रिया दिली. ‘कधीकधी विचार करतो की आता शो करणार नाही. परंतु, हे लोक मला घेतात. मी नाही तर कोण करणार? त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही’ असेही तो म्हणाला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *