अभिनेता राजीव खंडेलवालला दिग्दर्शकानं बोलावलं आणि जे केलं ते विचित्रच..

 

मुंबई | कहीं तो होगा’ या हिंदी मालिकेमुळे अभिनेता राजीव खंडेलवाल नावारुपाला आला. राजीवचा आज 47वा वाढदिवस आहे. आज राजीव त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. छोट्या पडद्याबरोबरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत त्याने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. राजीवचा चाहतावर्गही मोठा आहे. कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना त्याला अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला होता. कास्टिंग काऊचलाही त्याला सामोरं जावं लागलं.

 

बॉलिवूडमध्ये सिनेमात चांगला रोल मिळवून देतो म्हणून अभिनेत्रीचे कास्टिंग काऊच केले जाते हे अनेकदा ऐकण्यात येते. काही वर्षापूर्वी यावरूनच मी टू ही चळवळ सुरू झाली. भूमिका देण्याचे सर्वाधिकार हे निर्माते, दिग्दर्शक यांच्याकडे असल्याने कास्टिंग काऊच प्रकरणी काही निर्माते दिग्दर्शक संशयाच्या भोवऱ्यातही आले होते. कास्टिंग काऊचचा अनुभव आपल्यालाही आल्याचा खुलासा काही वर्षापूर्वी राजीवने केला होता. वाढदिवसाच्या निमित्ताने राजीवच्या आयुष्यातील त्या नकोशा अनुभवाचा किस्सा सोशलमीडियावर चर्चेत आला आहे.

 

2018मध्ये ‘मीटू’ चळवळीला सुरुवात झाली. या प्रकरणामध्ये बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध व्यक्तींची नाव समोर येत असताना राजीवनेही त्यावेळी काही धक्कादायक खुलासे केले. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजीवला ‘मीटू’ चळवळीबाबत विचारण्यात आलं. यावेळी आपल्याबरोबरही विचित्र प्रकार घडला असल्याचं राजीवने सांगितलं होतं.

 

काय म्हणाला अभिनेता राजीव :
तो म्हणाला, “मी छोट्या पडद्यावर काम सुरु करण्यापूर्वीच एका दिग्दर्शकाने मला चित्रपटासाठी विचारलं. त्या दिग्दर्शकाने चित्रपट साईन करण्यासाठी मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं. त्यानंतर मला त्याने त्याच्या रुममध्ये येण्यास सांगितलं. पण त्यासाठी मी त्याला नकार दिला. बाहेर माझी गर्लफ्रेंड वाट पाहत आहे असं मी त्यावेळी त्या दिग्दर्शकाला उत्तर दिलं.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *