अभिनेते NTR यांच्या मुलीची आत्महत्या; अभिनय क्षेत्रात शोककळा

दिल्ली | दक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिवंगत अभिनेते, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, TDP पक्षाचे संस्थापक एनटी रामराव NTR यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. उमा माहेश्वरी असे त्यांच्या मुलीचे नाव होते. उमा यांचा मृतदेह पोलिसांना त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. यामुळे सर्वत्र एकाच खळबळ उडाली असून सध्या पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच पुढील तपास देखील सुरू आहे.

उमा माहेश्वरी या हैदराबाद मधील जुबली हिल्स इथे राहत होत्या. आपल्या राहत्या घरीच त्यांनी गळफास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्या काही आजारांशी झुंज देत होत्या. प्रकृती ठीक नसल्याने त्या आयुष्याला कांतळल्या होत्या. या संपूर्ण प्रकरण पोलिसांनी सांगितले की, ” प्रकृती ठीक नसल्याने त्या डिप्रेशनमध्ये होत्या त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.”

उमा माहेश्वरी यांच्या निधनाची ही बातमी समजताच संपूर्ण एनटीआर कुटुंबीय तिथे दाखल होत आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव हैदराबाद येथील त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले आहे. उमा माहेश्वरी या जुनियर एनटीआरच्या आत्या होत्या.

त्याला देखील उमा माहेश्वरी यांच्या निधनाची बातमी कळविण्यात आली आहे मात्र सध्या तो परदेशात आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आता दाक्षिणात्य सेनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी त्यांच्या घरी येत आहेत. चंद्राबाबा नायडू त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यासह देखील अंत्यदर्शनासाठी दाखल झाले आहेत.

एनटी रामराव यांना एकूण बारा मुलं होती. त्यापैकी उमा या सर्वांमध्ये लहान होत्या. भाजप नेत्या दग्गोबती पुरंदरेश्वरी आणि TDP अध्यक्ष नारा भुवनेश्वर या दोघी त्यांच्या बहिणी होत्या. नारा यांचे पती चंद्राबाबू नायडू हे आहेत.

उमा यांचे भाऊ अभिनेते आणि टीडीपी आमदार एन बालकृष्ण हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. एनटीआर हे अभिनेता, चित्रपट निर्माते आणि एक उत्तम राजकारणी होते. त्यांनी तीन टर्ममध्ये सात वर्षे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. 1996 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *