अबब! महेश बाबूच्या कोटींची संपत्ती पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क….

दिल्ली | आजच्या घडीला बॉलीवूडला मागे टाकत टॉलिवूड पुढे चालले आहे. अनेक भारदस्त कलाकार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आहेत. त्यातीलच एक महेश बाबू. काल ९ ऑगस्ट रोजी महेश बाबूचा वाढदिवस होता. आता तो ४७ वर्षांचा झाला आहे. आजवर त्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा अभिनय आणि त्याची लोकप्रियता पाहता यंदा त्याच्यासाठी एक मोठं आणि अनोखं बाशिस देण्यात आलं आहे.

आजवर प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केला गेल्याच तुम्ही पाहिलं आहे का? नक्कीच तुमच्याकडे नाही उत्तर असेल. आता जर तुम्ही महेश बाबूचे फॅन असाल तर तुम्ही त्याचा “पोकिरी” हा चित्रपट हमखास पहिला असेल. त्याच्या कारकिर्दीतील हा सर्वात जास्त हिट चित्रपट होता. यात त्यानेx दमदार अभिनय करून अनेकांची मने जिंकून घेतली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आहेत. त्यांनी यामध्ये महेशला एका वेगळ्या अँगलमध्ये दाखवलं होत.

एक खूप रागीट आणि गुंड मुलगा पुढे जाऊन एक पोलीस बनतो अशी याची कहाणी होती. तर आता याच चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी त्याचा “पोकिरी” हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे महेश साठी खूप मोठं गिफ्ट आहे.

पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याचे चाहते खूप खुश आहेत. यात विशेष बाब म्हणजे या चित्रपटाची सर्व कमाई ही महेश बाबूच्या एका एनजीओला दान केली जाणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याची खूप सारी तिकिटे बुक केली आहेत.

महेश बाबूने आजवर आपल्या अभिनयाने कोटींची कमाई केली आहे. त्याच्या संपत्ती विषयी बोलायचे झाल्यास त्याच्याकडे जवळपास ९ कोटी किंमतीच्या महागड्या गाड्या आहेत. तसेच
त्याचे स्वतःचे एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे. एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडया कंपनीचा तो मालक आहे. जुब्ली हिल्स येथे त्याचे एक आलिशान घर देखील आहे. तसेच बंगळुरू येथे देखील त्याचे एक घर आहे. या दोन्ही घरांची किंमत जवळपास २८ कोटींच्या पुढे आहे.

आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी महेश बाबू २० ते २५ कोटी रुपये मानधन घेतो. आता त्याची एकूण संपत्ती ही २४४ कोटींची आहे. त्याने या संपत्ती बरोबरच मनाची मोठी श्रीमंती देखील कमावली आहे. त्याचा चाहता वर्ग हेच त्याची खरी संपत्ती आहे असे तो मानतो. आजवर त्याने केलेला एकही चित्रपट फ्लॉप ठरला नाही. त्यामुळेच तो मनाने आणि संपत्तीने अफाट श्रीमंत अभिनेता आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *