अग्निवरीनाच्या भातीसाठी आलेल्या तरुणाचा ट्रेनिंग दरम्यान झाला मृत्यू; जे घडलं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल

औरंगाबाद | सैन्यात भरती होण्याची स्वप्न बघणारा प्रत्येक सैनिक हा देशाच्या सेवेत आपले प्राण गेले तरी पर्वा नाही अशा विचाराने जगत असतो. शत्रूच्या छाताडावर गोळ्या झाडून त्याला आपल्या देशाचा तिरंगा फडकवायचा असतो. सीमेवर तैनात राहून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचे रक्षण करायचे असते. मात्र असे स्वप्न पाहणाऱ्या कन्नड येथील एका युवकाचा सैन्यात भरती होण्याआधी मृत्यू झाला आहे.

सैन्यात भरती होण्यासाठी करण नामदेव पवार (२०) रा. कन्नड तालुका विठ्ठलवाडी. हा तरुण सैन्यात भरती होण्याची स्वप्न पाहत होता. यासाठी गेल्या ६ वर्षांपासून तो मेहनत घेत होता.

त्याच्या घरची परिस्थिती देखील बिकट होती. आई सतत आजारी असायची. घरी तो आई आणि त्याचा लहान भाऊ राहायचा. आई आजारी असल्याने छोटी मोठी कामे करून तो स्वतः घरी जेवण बनवायचा आणि आपल्या आईला आणि भावाला जेवू घालायचा. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले. त्याच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. यात तो आणि त्याचा लहान भाऊ पूर्ण खचून गेले.

मात्र नंतर करणने सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. अग्निविर सैन्य भरतीसाठी तो औरंगाबादला आला. इथे त्याचे ट्रेनिंग सुरू होते. तो आपल्या मित्रांना नेहमी सांगायचा की, मला सीमेवर मरण आले तर मी खूप भाग्यवान ठरेल. मला आपल्या देशासाठी शहीद व्हायचे आहे. १७ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता त्याची ट्रेनिंग सुरू होती.

यावेळी त्याला १६०० मीटर रानिंग करायचे होते. त्या ग्राउंडच्या फेऱ्या पूर्ण करत असताना शेवटच्या फेऱ्यात त्याला चक्कर आली. यावेळी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना १८ ऑगस्ट रोजी दुपारी त्याची प्राण ज्योत मालवली. त्याला हृदय विकाराचा झटका आला होता. ही माहिती कुटुंबीयांना मिळताच ते रुग्णालयात दाखल झाले.

त्याचा लहान भाऊ देखील धावत आला. आपल्या मोठ्या भावाला मृत अवस्थेत पाहून तो पूर्णतः हादरून गेला. आईच्या निधना नंतर तो हळूहळू सावरत होता. मात्र आता त्याच्या भावाला देखील देवाने स्वतः कडे बोलवून घेतले. यामुळे लहान भाऊ खूप दुःखी असून तो आता एकटा पडला आहे. तसेच इतर कुटुंबीय देखील या घटनेनं हळहळ व्यक्त करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *