शाळेत निघालेल्या दोन सख्या बहिणीचा भीषण अपघात, ट्रकने दोघींना चिरडल्याने जागीच झाला मृत्यू…..

पुणे | रस्त्यावरील अपघात घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कधी रस्त्यावर असलेल्या खड्यांमुळे तर कधी समोरच्या व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागतो आहे. पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे. यात दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे.

सकाळची शाळा असल्याने या दोन्ही मुली आपल्या मामाबरोबर दुचाकीवर बसल्या. कवडीपाठ येथून त्या दोघींना घेऊन मामा शाळेत निघाला. यावेळी रस्त्यात त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. सकाळी साडेसातच्या सुमारास रस्त्यावर जास्त गर्दी नव्हती. मात्र तरी देखील मागून एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. यात गाडी रस्त्यावर पडली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर येथील कवडीपाठ येथे मामा नवनाथ भिक्षे आपल्या दोन भाच्या (गायत्री नंदकुमार शितोळे – १७) आणि (राजश्री नंदकुमार शितोळे – १०) या दोघींना घेऊन कन्या शाळेत सोडवायला निघाले होते. पुणे सोलापूर महामार्ग लोणी काळभोर स्टेशन परिसरात एका ट्रकने त्यांच्या गाडीला पाठीमागून मोठी धडक दिली.

यात तिघे देखील रस्त्यावर पडले. मामा रस्त्याच्या कडेला फेकला गेला. तर दोन्ही मुली तिथेच पडल्या. ट्रक वेगात असल्याने त्याचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. यातच दोघींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरले असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन्ही मुलींचा एकत्र मृत्यू झाल्याने मामा देखील खूप खचून गेला आहे. तसेच कुटुंबीयांवर देखील दुःखाची छाया पसरली आहे. त्याचबरोबर शाळेतील सर्व विद्यार्थि आणि शिक्षक वर्ग देखील या घटनेने दुःखी आहेत. सदर घटनेचा लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करत आहेत. अशात घटने नंतर ट्रक चालकाने आपल्या ट्रक बरोबर तेथून पळ काढला आहे. पोलीस त्याच्या शोधत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *