अमरावतीत पीकअप वाहनाचा भीषण अपघात, चौघांचा जागीच झाला मृत्यू

अमरावती | आपली काही चूक नसताना देखील इतर व्यक्तींनी त्यांची कामे नीट न केल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अमरावती येथे अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका पिकअप गाडीचा अपघात झाल्याने चार व्यक्तींचा यात जागीच मृत्यू झाला आहे.

अमरावतीच्या मेळघाटमध्ये एका पिकअप वाहनाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू झाला असून 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आठवडी बाजारातून ही गाडी १४ प्रवाशांना घेऊन पुन्हा गावात चालली होती. धारणी तालुक्यातील मेळघाटातील सुसर्दा राणीगाव मार्गे आकोटला हे पिकअप वाहन चालले होते. घाटातून जात असताना वळणावर आल्यानंतर वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी पलटी झाली. घाटातील रस्त्यांची सध्या चाळण झाली आहे. त्यामुळेच इथे नेहमीच अपघात होतं असतात.

अमरावती जिल्ह्यामधील मेळघाट हा अतिदुर्गम आदिवासी भाग आहे. एकीकडे देशाची प्रगती होतं असली तरी हा भाग अजून प्रगती पासून खूप दूर आहे. या ठिकाणी एकही चांगला रस्ता नाही. सर्व रस्त्यावर खड्डे झाले आहेत. येतील गावकऱ्यांना नेहमीच दळणवळणासाठी पायपीट करावी लागते.

या गावाला बसची देखील सोय नीट नाही. गावातून बाहेर गेल्यावर लगेचच गाडी मिळत नाही. त्यामुळे अनेक पीकअप गाड्या यात खूप व्यक्तींना भारतात आणि मगच गडी सुरू करतात. प्रशासन नेहमीच या भागांकडे दुर्लक्ष करताना दिसले आहे. मात्र आता नागरिक संतापले असून लोकप्रतनिधींनी या सोई पुरवाव्यात अशी मागणी करत आहेत.

आठ दिवसांपूर्वी मेळघाटमध्ये असाच एक अपघात घडला होता. यावेळी टेंबुरसोंडा गावाजवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका क्रुझरचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये एकूण १४ प्रवाशी होते. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर १३ प्रवाशी जखमी झाले होते.

या घटनेतून लोक सावरत नाही तोच आज पुन्हा मेळघाटात अपघाताची घटना घडली आहे. मेळघाटात रस्त्याच्या आणि सुविधांच्या अभावी अजून किती लोकांचा जीव जाणार, प्रशासनाला जाग कधी येणार असा प्रश्न स्थानिक व्यक्ती विचारत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *